टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमवल्याने उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं. विराट कोहलीचा कर्णधारपदाची टी २० मधली ही शेवटची स्पर्धा आहे. नामिबियासोबतच्या सामन्यानंतर विराट कोहली संघात खेळाडू म्हणून असणार आहे. टी २० वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहली आणि नाणेफेकीची बरीच चर्चा रंगली. पहिल्या तीन सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर स्कॉटलंड आणि नामिबिया विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. नामिबिया विरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकत विराट कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

विराट कोहलीने या वर्षी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधारपद भूषवलं. त्यात १७ वेळा नाणेफेकीचा कौल हरला आहे. विराट कोहलीने नाणेफेकीचा बाबतीत आपलं नशिब साथ देत नसल्याचं मान्य केलं आहे. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर विराट कोहलीने सांगितलं की, “नाणेफेक खूप ठरवत असते. आपल्याला रणनिती आखता येते. मला कर्णधारपदासाठी संधी दिली गेली. ही सन्मानाची बाब आहे.”

पहिला सामना पाकिस्तानसोबत झाला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकल्याने भारताला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली होती. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही भारताने नाणेफेकीचा कौल हरला. त्यामुळे पुन्हा प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यानंतर आता अफगाणिस्तानसोबतही भारताने नाणेफेक गमावली आणि पहिली फलंदाजी करावी लागली होती. भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकला. त्यानंतर स्कॉटलंड विरुद्धचा सामन्यात नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तसेच दिलेलं आव्हान ठरविक षटकात पूर्ण केलं होतं. दुसरीकडे, विराट कोहली टॉस जिंकल्यानंतर त्यांच्या अंदाजात व्यक्त झाले आहेत.

राहुल द्रविड सर्वात वर!
नुकतीच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झालेल्या राहुल द्रविडचा टॉस जिंकण्याच्या बाबतीत सर्वात वरचा क्रमांक लागतो. “विराट कोहलीनं आत्तापर्यंत नेतृत्व केलेल्या सामन्यांपैकी फक्त ४० टक्के सामन्यांमध्ये टॉस जिंकला आहे. त्याउलट राहुल द्रविडचा हा रेकॉर्ड सर्वात उत्तम असून त्याने ५८ ते ६० टक्के सामन्यांमध्ये टॉस जिंकला आहे. धोनीनं ४७-४८ टक्के सामन्यांमध्ये टॉस जिंकला आहे. कोहली या यादीत सर्वात खाली आहे. याचा अर्थ कोहलीला नशीब साथ देत नाही”, असं आकाश चोप्रा म्हणाल्याचं स्पोर्ट्सकीडानं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

Story img Loader