Women’s T20 WC 2020 : स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले. सलामीवीर एलिसा हेली (७५) आणि बेथ मूनी (७८*) यांच्या फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १८४ धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला फलंदाजांनी अत्यंत दीनवाणी कामगिरी केली आणि विजेतेपदाची संधी गमावली.

T20 World Cup : हृदयद्रावक! पराभवानंतर १६ वर्षीय शफालीला अश्रू अनावर

सामन्यानंतर विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर चाहत्यांशी संवाद साधताना सोफी मोलीन्यूक्सने एक कौतुकास्पद गोष्ट केली. सोफीला भेटण्यासाठी एक दिव्यांग चिमुकली चाहती आपल्या व्हिलचेअरवरून आली. तिला तेथे पाहिल्यावर सोफीने तिची आपुलकीने विचारपूस तर केलीच, पण त्यानंतर आपल्या गळ्यातील विजेतेपदाचं सुवर्णपदक काढून तिने थेट त्या चिमुकलीच्या गळ्यात घातले अन् तिच्यासोबत फोटोही काढला.

T20 World Cup Final : हरमनप्रीतसाठी अंतिम सामना ‘ट्रिपल स्पेशल’, कारण…

ऑस्ट्रेलियाने जिंकले पाचवे टी २० विश्वविजेतेपद –

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरूवात केली. क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची सलामीवीर एलिसा हेलीने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या. धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली. त्यानंतर सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीने जबाबदारीने खेळ केला. तिने नाबाद ७८ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ ची धावसंख्या गाठून दिली. संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी अंतिम सामन्यात प्रचंड धावा खर्च केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर ती २ धावा काढून बाद झाली. त्यानंतर दुखापतग्रस्त तानिया भाटीयाच्या जागी मैदानावर आलेली जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली. आधीच्या षटकात २ चौकार लगावलेली स्मृती मानधना ११ धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर ४ धावांवर माघारी परतली. दिप्ती शर्माने झुंज देत सर्वाधिक ३३ धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचे तब्बल ६ फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक ४ बळी टिपले.

Story img Loader