Women’s T20 WC 2020 : स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले. सलामीवीर एलिसा हेली (७५) आणि बेथ मूनी (७८*) यांच्या फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १८४ धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला फलंदाजांनी अत्यंत दीनवाणी कामगिरी केली आणि विजेतेपदाची संधी गमावली.
T20 World Cup 2020 : ‘क्रिकेटच्या देवा’चा महिला संघाला मोलाचा सल्ला, म्हणाला…
“आपल्या महिला खेळाडू खूप चांगल्या खेळल्या. फक्त अंतिम सामन्याचा दिवस त्यांचा नव्हता. पण संपूर्ण स्पर्धेत त्यांनी ज्या प्रकारची कामगिरी करून दाखवली ती वाखाणण्याजोगी आहे. पुढच्या वेळी अधिक प्रयत्न करा. यश तुमचेच असेल,” अशा शब्दात सेहवागने महिला संघाला धीर दिला. सामन्यात पराभूत झाल्यावर भारतीय संघ हवालदिल झावा होता. १६ वर्षीय शफालीला तर अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
VIDEO : कौतुकास्पद! चिमुकल्या दिव्यांग चाहतीला दिलं विश्वविजेतेपदाचं सुवर्णपदक
Our girls gave their everything, just had one bad day but it was so wonderful to see the way in which they played barring today .Wishing them better luck next time. Congratulations to Australia on winning the #T20WorldCup
— Virender Sehwag (@virendersehwag) March 8, 2020
फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघ ठरला वरचढ
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरूवात केली. एलिसा हेलीने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या. सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीनेही जबाबदारीने खेळ केला. तिने नाबाद ७८ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ ची धावसंख्या गाठून दिली.
T20 World Cup : हृदयद्रावक! पराभवानंतर १६ वर्षीय शफालीला अश्रू अनावर
या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर ती २ धावा काढून बाद झाली. तानिया भाटीया दुखापतग्रस्त झाली. त्यानंतर जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर, स्मृती मानधना ११ धावांवर तर कर्णधार हरमनप्रीत कौर ४ धावांवर माघारी परतली. दिप्ती शर्माने एकाकी झुंज देत सर्वाधिक ३३ धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचे तब्बल ६ फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक ४ बळी टिपले.