यजमान ओमानने टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात विजयासह केली आहे. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात त्यांनी पापुआ न्यू गिनीचा (पीएनजी) १० गडी राखून पराभव केला. ओमानचा कर्णधार जीशान मकसूदने नाणेफेक जिंकून पीएनजी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पीएनजी संघ २० षटकांत ९ गडी गमावून १२९ धावाच करू शकला. ओमानने १३.४ षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठले. जतिंदर सिंगने नाबाद ७३ धावा केल्या. तर दुसरा सलामीवीर आकिब इलियासने नाबाद ५० धावा केल्या.

१३० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आकिब आणि जतिंदरने ओमानला चांगली सुरुवात दिली. पॉवरप्लेमध्येच संघाने कोणतीही विकेट न गमावता ४६ धावा जोडल्या. यानंतर या दोघांनी १२व्या षटकातच १०० चा आकडा पार केला. जतिंदरने षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने १२व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला आणि वैयक्तिक धावसंख्या ५५ धावा केली. त्यानंतर आकिबनेही डावाच्या १४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले.

हेही वाचा – अबब..! टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड घेणार ‘इतकं’ मानधन

तत्पूर्वी, ओमानचा कर्णधार जीशानने अवघ्या २० धावांत ४ बळी घेतले, त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले. पीएनजी कर्णधार असद वाला याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ४३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार मारले. असदने चार्ल्स अमिनी (३७) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावा जोडल्या. ओमानकडून बिलाल खान आणि कलीमुल्लाहनेही 2-2 विकेट्स घेतल्या.

Story img Loader