अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगेलल्या टी-२० वर्ल्डकपच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर ६६ धावांनी मात केली आहे. या विजयासह भारताने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवत चाहत्यांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. पहिले दोन सामने गमावलेल्या भारतीय संघाला आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी जर-तर या समीकरणावर अवलंबून राहावे लागणार आहे. पण जुन्या कामगिरीच्या कटू आठवणी बाजूला ठेवत विराटसेनेने आज अफगाणिस्तानची धुलाई केली. अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची अर्धशतके, तर हार्दिक पंड्या-ऋषभ पंत यांनी काढलेल्या झटपट धावांमुळे भारताने अफगाणिस्तानसमोर २११ धावांचे आव्हान ठेवले. रोहित-राहुलने सलामीला येत १४० धावांची भागीदारी रचली. तर पंड्या-पंत यांनी शेवटच्या २१ चेंडूत तब्बल ६३ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी स्फोटक फटकेबाजी केली, पण भारताच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. २० षटकात अफगाणिस्तानला ७ बाद १४४ धावांपर्यंतच पोहोचता आले. रोहित सामनावीर ठरला. या विजयासह भारताने आपल्या गुणांचे खाते उघडले.मोठ्या फरकाने हरवल्याने भारताची धावगती धन (+०.०७३) झाली आहे.

अफगाणिस्तानचा डाव

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. त्याने शहजादला झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. शहजादनंतर जसप्रीत बुमराहने आक्रमक झाझाईलाही (१३) माघारी पाठवले. या दोघांनंतर गुलबदिन नैब आणि रहमतुल्लाह गुरबाझ यांनी फटकेबाजी केली. पॉवरप्लेमध्ये अफगाणिस्तानने २ बाद ४७ धावा केल्या. पॉवरप्लेनंतर अफगाणिस्तानला तिसरा धक्का बसला. फिरकीपटू रवींद्र जडेजाने रहमतुल्लाहला तंबूत पाठवले. सीमारेषेवर हार्दिकने त्याचा अवघड झेल घेतला. रहमतुल्लाहने १९ धावा केल्या. रहमतुल्लाहनंतर नजीबउल्लाह झादरान फलंदाजीला आला. चार वर्षानंतर टीम इंडियाच्या टी-२० संघात खेळणाऱ्या रवीचंद्रन अश्विनने भारताला चौथे यश मिळवून दिले. १०व्या षटकात त्याने नैबला (१८) पायचीत पकडले. नैबनंतर अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबी मैदानात आला. अश्विनने १२व्या षटकात पुन्हा गोलंदाजीला येत अफगाणिस्तानचा पाचवा फलंदाज तंबूत पाठवला. त्याने झादरानचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. ६९ धावांत अफगाणिस्तानने पाच फलंदाज गमावले. त्यानंतर कप्तान मोहम्मद नबी आणि करिम जनत यांनी अफगाणिस्तानने शतक पूर्ण केले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली, पण विजयासाठी ती अपूर्ण ठरली. अफगाणिस्तानला २० षटकात ७ बाद १४४ धावांपर्यंत पोहोचता आले. करिम जनत २२ चेंडूत ४२ धावांवर नाबाद राहिला. त्याने ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. भारताकडून शमीने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर अश्विनने ४ षटकात १४ धावा देत २ बळी टिपले. या विजयासह भारताने २ गुणांची कमाई केली आहे.

हेही वाचा – ‘द वॉल’ इज बॅक..! राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच; BCCIची माहिती

भारताचा डाव

मागील सामन्यातील फसलेल्या प्रयोगातून धडा घेत भारताने नियमित सलामीवीर सलामीवीर मैदानात उतरवले. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी भारतासाठी चांगली सुरुवात केली. पाच षटकात भारताने अर्धशतक ओलांडले. पॉलरप्लेनंतर भारताचा वेग थोडा मंदावला, पण रोहितने फटकेबाजी करत दबाव कमी केला. १२व्या षटकात रोहितने तर पुढच्याच षटकात राहुलने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर २४ धावांची भर घालून रोहित बाद झाला. करिम जनतने त्याला तंबूत धाडले. रोहितने ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. त्याने राहुलसोबत १४० धावांची सलामी दिली. १७व्या षटकात राहुलही माघारी परतला. नैबने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. राहुलने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली. या दोघांनंतर हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांनी सूत्रे हातात घेतली. या दोघांनी २१ चेंडूत ६३ धावांची नाबाद भागीदारी केली. जलदगती गोलंदाज हसनने टाकलेल्या २०व्या षटकात पंत-पंड्याने १६ धावा वसूल केल्यामुळे भारताला दोनशेपार जाता आले. २० षटकात भारताने २ बाद २१० धावा केल्या. हार्दिक पंड्याने १३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारासह नाबाद ३५ तर ऋषभ पंतने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २७ धावा केल्या.

Live Updates
23:15 (IST) 3 Nov 2021
भारत विजयी

अफगाणिस्तानला २० षटकात ७ बाद १४४ धावांपर्यंत पोहोचता आले. करिम जनत २२ चेंडूत ४२ धावांवर नाबाद राहिला. त्याने ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. भारताकडून शमीने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर अश्विनने ४ षटकात १४ धावा देत २ बळी टिपले. या विजयासह भारताने २ गुणांची कमाई केली आहे.

23:07 (IST) 3 Nov 2021
१९ षटकात अफगाणिस्तान

१९ षटकात अफगाणिस्तानने ७ बाद १३० धावा केल्या.

23:04 (IST) 3 Nov 2021
नबी, राशिद माघारी

१८व्या षटकात शमीने भागीदारी मोडली. त्याने नबीला बाद केले. नबीने ३५ धावांची खेळी केली. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शमीने राशिद खानला (०) झेलबाद केले.

22:58 (IST) 3 Nov 2021
अफगाणिस्तानचे शतक पूर्ण

१७ षटकात नबी आणि करिम जनत यांनी अफगाणिस्तानने शतक पूर्ण केले. १८ षटकात त्यांनी ५ बाद १२५ धावा केल्या. याच षटकात नबी आणि करिम यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली

22:42 (IST) 3 Nov 2021
१५ षटकात अफगाणिस्तान

१५ षटकात अफगाणिस्तानने ५ बाद ८८ धावा केल्या.

22:32 (IST) 3 Nov 2021
अफगाणिस्तानचा अर्धा संघ गारद

अश्विनने १२व्या षटकात पुन्हा गोलंदाजीला येत अफगाणिस्तानचा पाचवा फलंदाज तंबूत पाठवला. त्याने झादरानचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. ६९ धावांत अफगाणिस्तानने पाच फलंदाज गमावले. १२ षटकात अफगाणिस्तानने ५ बाद ७० धावा केल्या.

22:21 (IST) 3 Nov 2021
भारताला चौथे यश

चार वर्षानंतर टीम इंडियाच्या टी-२० संघात खेळणाऱ्या रवीचंद्रन अश्विनने भारताला चौथे यश मिळवून दिले. १०व्या षटकात त्याने नैबला (१८) पायचीत पकडले. नैबनंतर अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबी मैदानात आला आहे. १० षटकात अफगाणिस्तानने ४ बाद ५९ धावा केल्या.

22:13 (IST) 3 Nov 2021
अफगाणिस्तानचा तिसरा गडी तंबूत

पॉवरप्लेनंतर अफगाणिस्तानला तिसरा धक्का बसला. फिरकीपटू रवींद्र जडेजाने रहमतुल्लाहला तंबूत पाठवले. सीमारेषेवर हार्दिकने त्याचा अवघड झेल घेतला. रहमतुल्लाहने १९ धावा केल्या. रहमतुल्लाहनंतर नजीबउल्लाह झादरान फलंदाजीला आला आहे.

22:10 (IST) 3 Nov 2021
अफगाणिस्तानचा तिसरा गडी तंबूत

पॉवरप्लेनंतर अफगाणिस्तानला तिसरा धक्का बसला. फिरकीपटू रवींद्र जडेजाने रहमतुल्लाहला तंबूत पाठवले. सीमारेषेवर हार्दिकने त्याचा अवघड झेल घेतला. रहमतुल्लाहने १९ धावा केल्या. रहमतुल्लाहनंतर नजीबउल्लाह झादरान फलंदाजीला आला आहे.

22:04 (IST) 3 Nov 2021
पॉवरप्लेमध्ये अफगाणिस्तान

पॉवरप्लेमध्ये अफगाणिस्तानने २ बाद ४७ धावा केल्या. नैब १५ तर रहमतुल्लाह १९ धावांवर नाबाद आहे.

22:00 (IST) 3 Nov 2021
पाच षटकात अफगाणिस्तान

पाचवे षटक शमीने टाकले. नैब आणि रहमतुल्लाह यांनी शमीला या षटकात २१ धावा कुटल्या. पाच षटकात अफगाणिस्तानने २ बाद ३८ धावा केल्या.

21:49 (IST) 3 Nov 2021
अफगाणिस्तानला लागोपोठ धक्के

तिसऱ्या षटकात भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने शहजादला झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. शहजादनंतर जसप्रीत बुमराहने आक्रमक झाझाईलाही (१३) माघारी पाठवले. या दोघांनंतर गुलबदिन नैब आणि रहमतुल्लाह गुरबाझ मैदानात आले.

21:23 (IST) 3 Nov 2021
भारताचे अफगाणिस्तानला २११ धावांचे आव्हान

जलदगती गोलंदाज हसनने टाकलेल्या २०व्या षटकात पंत-पंड्याने १६ धावा वसूल केल्यामुळे भारताला दोनशेपार जाता आले. २० षटकात भारताने २ बाद २१० धावा केल्या. हार्दिक पंड्याने १३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारासह नाबाद ३५ तर ऋषभ पंतने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २७ धावा केल्या.

21:15 (IST) 3 Nov 2021
१९ षटकात भारत

पंत-पंड्याने १९व्या षटकात १९ धावा कुटल्या. १९ षटकात भारताने २ बाद १९४ धावा केल्या.

21:07 (IST) 3 Nov 2021
१८ षटकात भारत

पंत-पंड्याने १८व्या षटकात १५ धावा कुटल्या. १८ षटकात भारताने २ बाद १७५ धावा केल्या.

21:02 (IST) 3 Nov 2021
राहुल माघारी

१७व्या षटकात राहुलही माघारी परतला. नैबने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. राहुलने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली. राहुलनंतर हार्दिक पंड्या मैदानात आला आहे. १७ षटकात भारताने २ बाद १६० धावा केल्या

20:49 (IST) 3 Nov 2021
रोहित माघारी

१५व्या षटकात रोहित माघारी परतला. करिम जनतने त्याला तंबूत धाडले. रोहितने ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. त्याने राहुलसोबत १४० धावांची सलामी दिली. रोहितनंतर ऋषभ पंत मैदानात आला आहे. १५ षटकात भारताने १ बाद १४२ धावा केल्या.

20:35 (IST) 3 Nov 2021
रोहितचे अर्धशतक

१२व्या षटकात रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केले. १२ षटकात भारताने बिनबाद १०७ धावा केल्या.

20:21 (IST) 3 Nov 2021
१० षटकात भारत

१० षटकात भारताने ८५ धावा केल्या आहेत. रोहित ४४ तर राहुल ४० धावांवर नाबाद आहे.

20:12 (IST) 3 Nov 2021
आठ षटकात भारत

आठ षटकात भारताने बिनबाद ६५ धावा केल्या आहेत.

20:02 (IST) 3 Nov 2021
पॉवरप्लेमध्ये भारत

पॉवरप्लेच्या सहा षटकात भारताने बिनबाद ५३ धावा केल्या. रोहित ३४ तर राहुल १८ धावांवर नाबाद आहे.

19:51 (IST) 3 Nov 2021
चार षटकात भारत

चार षटकात भारताने बिनबाद ३५ धावा केल्या.

19:46 (IST) 3 Nov 2021
तीन षटकात भारत

तीन षटकात भारताने बिनबाद ३० धावा केल्या.

19:40 (IST) 3 Nov 2021
दुसऱ्या षटकात भारत

दुसऱ्या षटकात राहुलने एक चौकार आणि एका षटकाराची कमाई केली. २ षटकात भारताने बिनबाद २३ धावा केल्या.

19:35 (IST) 3 Nov 2021
पहिल्या षटकात भारत

अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबीने पहिले षटक टाकले. या षटकात रोहितने चौकार खेचला. पहिल्या षटकात भारताने बिनबाद ७ धावा केल्या.

19:29 (IST) 3 Nov 2021
भारताचे सलामीवीर मैदानात

रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी भारतासाठी सलामी दिली आहे.

19:12 (IST) 3 Nov 2021
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह.

अफगाणिस्तान: मोहम्मद नबी (कर्णधार), हजरतुल्ला झाझाई, मोहम्मद शहजाद (यष्टीरक्षक), रहमानउल्लाह गुरबाज, नजीबुल्ला झादरान, करीम जनात, राशिद खान, गुलबदिन नैब, नवीन-उल-हक, हमीद हसन, शराफुद्दीन अश्रफ.

19:06 (IST) 3 Nov 2021
अफगाणिस्तानची प्रथम गोलंदाजी

आजच्या सामन्यात अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.