बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताला मात देत नव्या इतिहासाची नोंद केली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्ताने भारताला पहिल्यांदाच मात दिली आहे. पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, केएल राहुल हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर विराटने किल्ला लढवला. त्याच्या अर्धशतकी योगदानामुळे भारताने पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने धडकी भरवणारा स्पेल टाकला आणि रोहित, राहुल आणि विराटला माघारी धाडले. प्रत्युत्तरात सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कप्तान बाबर आझम यांनी दमदार १५२ धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. रिझवानने नाबाद ७९ तर बाबरने नाबाद ६८ धावांची खेळी केली. आफ्रिदीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाकिस्तानचा डाव

कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने पाकिस्तानसाठी उत्तम सुरुवात केली. भुवनेश्वरने भारतासाठी पहिले षटक टाकले. या षटकात पाकिस्तानने बिनबाद १० धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये भारताला विकेट मिळवण्यात अपयश आले. ६ षटकात पाकिस्तानने बिनबाद ४३ धावा केल्या. पॉवरप्लेनंतर रिझवान आणि बाबरने आक्रमक खेळायला सुरुवात केली. १३व्या षटकात बाबरने वरुण चक्रवर्तीला शानदार षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात पाकिस्तानने शंभरी ओलांडली. बाबरपाठोपाठ रिझवाननेही बुमराहला चौकार ठोकत आपले अर्धशतक साजरे केले. त्याचे हे भारताविरुद्ध पहिले अर्धशतक ठरले. १८व्या षटकात पाकिस्ताने विजयावर शिक्कामोर्तब केले. बाबरने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा, तर रिझवानने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ७९ धावा केल्या.

हेही वाचा – T20 WC: रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम; पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गिरवला कित्ता

भारताचा डाव

केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी भारतासाठी सलामी दिली. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदीने हिटमॅन रोहित शर्माला शून्यावर पायचीत पकडले. तर तिसऱ्या षटकात त्याने राहुलला क्लीन बोल्ड केले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकले. या षटकात त्याने सूर्यकुमारला यष्टीपाठी झेलबाद केले. पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने सुंदर झेल घेतला. ६ षटकात भारताने ३ बाद ३६ धावा केल्या. या पडझडीनंतर विराट कोहली आणि ऋषभ पंतने भारतासाठी किल्ला लढवला. १२व्या षटकात पंतने हसन अलीला लागोपाठ २ षटकार खेचले. या षटकात विराट कोहली-ऋषभ पंतने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पुढच्याच षटकात पंतने आक्रमक अंदाजात शादाब खानला मोठा फटका खेळला, पण तो झेलबाद झाला. पंतने २ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्या. १५व्या षटकात भारताने शतक पूर्ण केले, तर १८व्या षटकात विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात आफ्रिदीने विराटला बाद केले. विराटने ५ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावा केल्या. २० षटकात भारताने ७ बाद १५१ धावा केल्या. हरीस रौफने पाकिस्तानसाठी टाकलेल्या शेवटच्या षटकात ७ धावा दिल्या. आफ्रिदीने ३१ धावांत ३, तर हसन अलीने ४४ धावांत २ बळी घेतले.

Live Updates
20:28 (IST) 24 Oct 2021
११ षटकात भारत

११ षटकात भारताने ३ बाद ६६ धावा केल्या. विराट कोहली २८ तर ऋषभ पंत २२ धावांवर नाबाद आहे.

20:20 (IST) 24 Oct 2021
१० षटकात भारत

१० षटकात भारताने ३ बाद ६० धावा केल्या. विराट कोहली २६ तर ऋषभ पंत १९ धावांवर नाबाद आहे.

20:17 (IST) 24 Oct 2021
भारताचे अर्धशतक पूर्ण

९व्या षटकात भारताने अर्धशतक फलकावर लावले. ९ षटकात भारताने ३ बाद ५२ धावा केल्या.

20:15 (IST) 24 Oct 2021
आठ षटकात भारत

८ षटकात भारताने ३ बाद ४३ धावा केल्या आहेत. विराट कोहली २२ धावांवर नाबाद आहे.

20:07 (IST) 24 Oct 2021
सात षटकात भारत

७ षटकात भारताने ३ बाद ३९ धावा केल्या आहेत. विराट कोहली २० धावांवर नाबाद आहे.

20:03 (IST) 24 Oct 2021
सूर्यकुमार यादव बाद

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकले. या षटकात त्याने सूर्यकुमारला यष्टीपाठी झेलबाद केले. पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने सुंदर झेल घेतला. सूर्यकुमारनंतर ऋषभ पंत मैदानात आला आहे. ६ षटकात भारताने ३ बाद ३६ धावा केल्या.

19:56 (IST) 24 Oct 2021
विराटचा जबरदस्त षटकार

भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीने पाचवे षटक टाकले. या षटकात विराटने त्याला जबरदस्त षटकार ठोकला. ५ षटकात भारताने २ बाद ३० धावा केल्या.

19:51 (IST) 24 Oct 2021
चौथ्या षटकात भारत

पाक संघाचा फिरकीपटू इमाद वसिमने चौथे षटक टाकले. चार षटकात भारताने २ बाद २१ धावा केल्या.

19:43 (IST) 24 Oct 2021
भारताला अजून एक धक्का

तिसऱ्या षटकात आफ्रिदीने राहुलला क्लीन बोल्ड केले. राहुलने ३ धावा केल्या. त्याच्यानंतर आपला पहिला वर्ल्डकप सामना खेळण्यासाठी सूर्यकुमार यादव मैदानात आला आहे. त्याने भारताच्या डावाचा पहिला षटकार ठोकला. ३ षटकात भारताने २ बाद १४ धावा केल्या.

19:41 (IST) 24 Oct 2021
दुसऱ्या षटकात भारत

पाक संघाचा फिरकीपटू इमाद वसिमने दुसरे षटक टाकले. भारताने २ षटकात १ बाद ६ धावा केल्या.

19:35 (IST) 24 Oct 2021
भारताला पहिला धक्का; रोहित शून्यावर माघारी

आफ्रिदीने हिटमॅन रोहित शर्माला शून्यावर पायचीत पकडले आहे. रोहितनंतर कप्तान विराट कोहली मैदानात आला आहे. पहिल्या षटकात भारताने १ बाद २ धावा केल्या.

19:29 (IST) 24 Oct 2021
भारताचे सलामीवीर मैदानात

केएल राहुल आणि रोहित शर्मा हे भारताचे सलामीवीर मैदानात आले आहेत. शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानसाठी पहिले षटक टाकत आहे. राहुलने पहिला चेंडू खेळला.

19:12 (IST) 24 Oct 2021
भारतीय संघातून कोण बाहेर?

भारताच्या प्लेईंग इलेव्हनमधून इशान किशन, शार्दुल ठाकूर, राहुल चहर आणि रवीचंद्रन अश्विन बाहेर पडले आहेत.

19:07 (IST) 24 Oct 2021
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी .

पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, आसिफ अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरीस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.

19:04 (IST) 24 Oct 2021
पाकिस्ताननं जिंकली नाणेफेक

आजच्या सामन्यात पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

18:24 (IST) 24 Oct 2021
कधी होणार टॉस?

सांयकाळी ७ वाजता टॉस होणार आहे.

18:22 (IST) 24 Oct 2021
बाबर आझमची प्रतिक्रिया

इतिहासाची उजळणी करण्यात आम्हाला मुळीच रस नाही. आम्ही विश्वविजेतेपदाच्या निर्धाराने येथे दाखल झालो असून भारताविरुद्धची लढत आमच्यासाठी अन्य सामन्याप्रमाणेच आहे. यंदा सर्व खेळाडू भारताला नमवण्याबाबत आशावादी असून आमच्या मैदानातील कामगिरीद्वारेच आम्ही ते दाखवून देऊ! 

18:21 (IST) 24 Oct 2021
विराट कोहलीची प्रतिक्रिया

भारत-पाकिस्तान सामन्याविषयी सगळीकडेच अनावश्यक चर्चा रंगते. परंतु आम्ही मात्र याकडे लक्ष न देण्यालाच प्राधान्य देतो. अमिरातीतील खेळपट्ट्यांचा अंदाज घेऊन आम्ही संघनिवड केली असून प्रत्येक खेळाडूला त्याच्या भूमिकेबाबत पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या स्पर्धेत नक्कीच दमदार कामगिरी करू, याची मला खात्री आहे.

17:26 (IST) 24 Oct 2021
कोण मारणार बाजी?

तुम्हाला काय वाटतं?

17:24 (IST) 24 Oct 2021
कोण मारणार बाजी?

५-०

17:17 (IST) 24 Oct 2021
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव/इशान किशन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/ भुवनेश्वर कुमार, रवीचंद्रन अश्विन/वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी .

पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, आसिफ अली/हैदर अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, हसन अली, शादाब खान, इमाद वसीम, हरीस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.

17:16 (IST) 24 Oct 2021
हेड-टू-हेड

भारत आणि पाकिस्तान यांच्यात ८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने वर्चस्व राखले आहे. यात भारताने ६ सामने जिंकले, पाकिस्तानला फक्त एकदाच जिंकता आले. एका सामन्याचा निकाल लागला नाही. दुसरीकडे, टी-२० विश्वचषकातही पाकिस्तानविरुद्ध भारताचे वर्चस्व आहे. पाकिस्तानी संघाने टी-२० एकदिवसीय विश्वचषकात भारतासमोर कधीही विजयाची चव चाखली नाही. दोन्ही संघ ५ वेळा भिडले आहेत आणि प्रत्येक वेळी भारताने विजय मिळवला आहे. भारतीय संघ आता विजयी षटकार मारण्याकडे लक्ष देईल.