बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताला मात देत नव्या इतिहासाची नोंद केली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्ताने भारताला पहिल्यांदाच मात दिली आहे. पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, केएल राहुल हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर विराटने किल्ला लढवला. त्याच्या अर्धशतकी योगदानामुळे भारताने पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने धडकी भरवणारा स्पेल टाकला आणि रोहित, राहुल आणि विराटला माघारी धाडले. प्रत्युत्तरात सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कप्तान बाबर आझम यांनी दमदार १५२ धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. रिझवानने नाबाद ७९ तर बाबरने नाबाद ६८ धावांची खेळी केली. आफ्रिदीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाकिस्तानचा डाव

कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने पाकिस्तानसाठी उत्तम सुरुवात केली. भुवनेश्वरने भारतासाठी पहिले षटक टाकले. या षटकात पाकिस्तानने बिनबाद १० धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये भारताला विकेट मिळवण्यात अपयश आले. ६ षटकात पाकिस्तानने बिनबाद ४३ धावा केल्या. पॉवरप्लेनंतर रिझवान आणि बाबरने आक्रमक खेळायला सुरुवात केली. १३व्या षटकात बाबरने वरुण चक्रवर्तीला शानदार षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात पाकिस्तानने शंभरी ओलांडली. बाबरपाठोपाठ रिझवाननेही बुमराहला चौकार ठोकत आपले अर्धशतक साजरे केले. त्याचे हे भारताविरुद्ध पहिले अर्धशतक ठरले. १८व्या षटकात पाकिस्ताने विजयावर शिक्कामोर्तब केले. बाबरने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा, तर रिझवानने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ७९ धावा केल्या.

हेही वाचा – T20 WC: रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम; पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गिरवला कित्ता

भारताचा डाव

केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी भारतासाठी सलामी दिली. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदीने हिटमॅन रोहित शर्माला शून्यावर पायचीत पकडले. तर तिसऱ्या षटकात त्याने राहुलला क्लीन बोल्ड केले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकले. या षटकात त्याने सूर्यकुमारला यष्टीपाठी झेलबाद केले. पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने सुंदर झेल घेतला. ६ षटकात भारताने ३ बाद ३६ धावा केल्या. या पडझडीनंतर विराट कोहली आणि ऋषभ पंतने भारतासाठी किल्ला लढवला. १२व्या षटकात पंतने हसन अलीला लागोपाठ २ षटकार खेचले. या षटकात विराट कोहली-ऋषभ पंतने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पुढच्याच षटकात पंतने आक्रमक अंदाजात शादाब खानला मोठा फटका खेळला, पण तो झेलबाद झाला. पंतने २ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्या. १५व्या षटकात भारताने शतक पूर्ण केले, तर १८व्या षटकात विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात आफ्रिदीने विराटला बाद केले. विराटने ५ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावा केल्या. २० षटकात भारताने ७ बाद १५१ धावा केल्या. हरीस रौफने पाकिस्तानसाठी टाकलेल्या शेवटच्या षटकात ७ धावा दिल्या. आफ्रिदीने ३१ धावांत ३, तर हसन अलीने ४४ धावांत २ बळी घेतले.

Live Updates
23:01 (IST) 24 Oct 2021
पाकिस्तानचा दमदार विजयारंभ

१८व्या षटकात पाकिस्ताने विजयावर शिक्कामोर्तब केले. बाबर आणि रिझवान यांनी १५२ धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताला १० गड्यांनी मात देण्यात सिंहाचा वाटा उचलला. बाबरने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा, तर रिझवानने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ७९ धावा केल्या.

22:53 (IST) 24 Oct 2021
१७ षटकात पाकिस्तान

१७ षटकात पाकिस्तानने बिनबाद १३५ धावा केल्या.

22:47 (IST) 24 Oct 2021
पाकिस्तानला २५ चेंडूत २४ धावांची गरज

पाकिस्तानने १६ षटकात बिनबाद १२८ धावा केल्या. त्यांना विजयासाठी २५ चेंडूत २४ धावांची गरज आहे.

22:39 (IST) 24 Oct 2021
मोहम्मद रिझवानचे अर्धशतक

बाबरपाठोपाठ रिझवाननेही बुमराहला चौकार ठोकत आपले अर्धशतक साजरे केले. त्याचे हे भारताविरुद्ध पहिले अर्धशतक ठरले.

22:35 (IST) 24 Oct 2021
१४ षटकात पाकिस्तान

१४ षटकात पाकिस्तानने बिनबाद ११२ धावा केल्या.

22:32 (IST) 24 Oct 2021
बाबरचे शानदार अर्धशतक

१३व्या षटकात बाबरने वरुण चक्रवर्तीला शानदार षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात पाकिस्तानने शंभरी ओलांडली. १३ षटकात पाकिस्तानने बिनबाद १०१ धावा केल्या. बाबर ५२ तर रिझवान ४६ धावांवर खेळत आहे.

22:27 (IST) 24 Oct 2021
१२ षटकात पाकिस्तान

१२ षटकात पाकिस्तानने बिनबाद ८५ धावा केल्या. बाबर ४४ तर रिझवान ३८ धावांवर खेळत आहे.

22:24 (IST) 24 Oct 2021
११ षटकात पाकिस्तान

११ षटकात पाकिस्तानने बिनबाद ८० धावा केल्या. बाबर ४३ तर रिझवान ३५ धावांवर खेळत आहे.

22:17 (IST) 24 Oct 2021
१० षटकात पाकिस्तान

१० षटकात पाकिस्तानने बिनबाद ७१ धावा केल्या. बाबर ३४ तर रिझवान ३५ धावांवर खेळत आहे.

22:12 (IST) 24 Oct 2021
९ षटकात पाकिस्तान

९ षटकात पाकिस्तानने बिनबाद ६२ धावा केल्या.

22:07 (IST) 24 Oct 2021
पाकिस्तानचे अर्धशतक

८व्या षटकात पाकिस्तानने अर्धशतक पूर्ण केले. पाकिस्तानने बिनबाद ५२ धावा फलकावर लावल्या. रिझवान ३० तर बाबर २० धावांवर नाबाद आहे.

22:03 (IST) 24 Oct 2021
७ षटकात पाकिस्तान

७ षटकात पाकिस्तानने बिनबाद ४६ धावा केल्या.

22:00 (IST) 24 Oct 2021
पॉवरप्लेमध्ये पाकिस्तान

पॉवरप्लेचे शेवटचे षटक भुवनेश्वरने टाकले. ६ षटकात पाकिस्तानने बिनबाद ४३ धावा केल्या.

21:54 (IST) 24 Oct 2021
५ षटकात पाकिस्तान

भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने पाचवे षटक टाकले. त्याने या षटकात ११ धावा खर्च केल्या. ५ षटकात पाकिस्तानने बिनबाद ३५ धावा केल्या.

21:50 (IST) 24 Oct 2021
४ षटकात पाकिस्तान

भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने चौथे षटक टाकले. त्याने या षटकात फक्त २ धावा दिल्या. ४ षटकात पाकिस्तानने बिनबाद २२ धावा केल्या.

21:46 (IST) 24 Oct 2021
३ षटकात पाकिस्तान

३ षटकात पाकिस्तानने बिनबाद २२ धावा केल्या.

21:41 (IST) 24 Oct 2021
२ षटकात पाकिस्तान

२ षटकात पाकिस्तानने बिनबाद १८ धावा केल्या.

21:33 (IST) 24 Oct 2021
पाकिस्तानच्या डावाची सुरुवात

कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने पाकिस्तानसाठी सलामी दिली. भुवनेश्वरने भारतासाठी पहिले षटक टाकले. रिझवानने भुवनेश्वरला षटकार ठोकला. पहिल्या षटकात पाकिस्तानने बिनबाद १० धावा केल्या.

21:20 (IST) 24 Oct 2021
भारताचं पाकिस्तानला १५२ धावांचं आव्हान

२० षटकात भारताने ७ बाद १५१ धावा केल्या. हरीस रौफने पाकिस्तानसाठी टाकलेल्या शेवटच्या षटकात ७ धावा दिल्या.

21:17 (IST) 24 Oct 2021
हार्दिक पंड्या माघारी

२०व्या षटकात हरिस रौफने हार्दिकला (११) झेलबाद केले.

21:09 (IST) 24 Oct 2021
विराट माघारी

१९व्या षटकात आफ्रिदीने विराटला बाद केले. विराटने ५ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावा केल्या. १९ षटकात भारताने ६ बाद १४४ धावा केल्या.

21:04 (IST) 24 Oct 2021
भारताचा अर्धा संघ तंबूत

विराटचे अर्धशतक झाल्यानंतर हसन अलीने जडेजाला (१३) झेलबाद केले. जडेजानंतर हार्दिक पंड्या मैदानात आला आहे. १८ षटकात भारताने ५ बाद १२७ धावा केल्या.

20:59 (IST) 24 Oct 2021
विराटचे अर्धशतक

१८व्या षटकात विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले.

20:58 (IST) 24 Oct 2021
१७ षटकात भारत

१७ षटकात भारताने ४ बाद ११४ धावा केल्या.

20:53 (IST) 24 Oct 2021
१६ षटकात भारत

१६ षटकात भारताने ४ बाद ११० धावा केल्या.

20:48 (IST) 24 Oct 2021
भारताचे शतक पूर्ण

१५व्या षटकात भारताने शतक पूर्ण केले. भारताने ४ बाद १०० धावा केल्या आहेत.

20:44 (IST) 24 Oct 2021
१४ षटकात भारत

१४ षटकात भारताने ४ बाद ९६ धावा केल्या.

20:42 (IST) 24 Oct 2021
भारत-पाक सामन्याचा आनंद घेतायत प्रेक्षक!

शहरातील विविध भागात भारत-पाक सामन्याचा आनंद घेतायत प्रेक्षक!

(फोटो सौजन्य – पवन खेंगरे, इंडियन एक्स्प्रेस)

20:37 (IST) 24 Oct 2021
पंत माघारी

पुढच्याच षटकात पंतने आक्रमक अंदाजात शादाब खानला मोठा फटका खेळला, पण तो झेलबाद झाला. पंतने २ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्या. पंतनंतर डावखुरा फलंदाज रवींद्र जडेजा मैदानात आला आहे. १३ षटकात भारताने ४ बाद ८७ धावा केल्या.

20:34 (IST) 24 Oct 2021
ऋषभ पंतचे सलग षटकार

१२व्या षटकात पंतने हसन अलीला लागोपाठ २ षटकार खेचले. १२ षटकात भारताने ३ बाद ८१ धावा केल्या. या षटकात विराट कोहली-ऋषभ पंतने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. विराट २८ तर पंत ३७ धावांवर नाबाद आहे.