टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली. भारतीय संघामध्ये रविचंद्रन अश्विनला चार वर्षांनंतर पुन्हा संधी देण्यात आलीय. तर माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला संघांचा मेंटॉर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. ओमान आणि यूएईमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी १८ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला असून भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे. १५ सदस्यांच्या भारतीय संघात सहा फलंदाज, तीन अष्टपैलू खेळाडू, तीन फिरकी गोलंदाज तर तीन जलदगती गोलंदाज आहेत. राखीव खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहरचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारत-पाकिस्तान सामन्यांची आकडेवारी काय सांगते?
भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यान शेवटचा टी २० सामना २०१६ मध्ये टी २० विश्वचषकादरम्यान खेळवण्यात आला होता. कोलकात्यामध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने सहा गडी राखून विजय मिळवला होता. कट्टर प्रतिस्पर्धी असणारे हे दोन्ही संघ आतापर्यंत टी २० विश्वचषकामध्ये पाच वेळा आमने-सामने आलेत. हे पाचही सामने भारताने जिंकलेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण ८ टी-२० सामने झाले असून त्यापैकी ७ भारताने जिंकलेत. पाकिस्ताने केवळ एकदाच भारताला पराभूत केलंय. पाकिस्तानला मिळालेला हा एकमेव विजय डिसेंबर २०१२ रोजी बेंगळुरुमधील मैदानात खेळताना मिळाला होता. पाकिस्तानने हा सामना पाच गडी राखून जिंकला होता. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी २० असं सर्व काही गृहित धरल्यास आतापर्यंत भारत पाकिस्तानमध्ये १७ सामने झाले असून त्यापैकी १४ सामने भारताने जिंकलेत.
नक्की पाहा हे फोटो >> विराटला त्या सेलिब्रेशनमुळे ‘Classless’ म्हणणाऱ्या ब्रिटीश मीडियाचा जाफरने उतरवला माज
सलामीवीर म्हणून पर्याय उपलब्ध
विराटच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच भारतीय संघ टी-२० विश्वचषक खेळणार असून स्पर्धेतील पाहिलाच सामना जिंकून भारतीय संघाची पाकिस्तानविरोधातील विजयी घौडदौड सुरु ठेवण्याचा विराटसेनेचा मानस असेल. या विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघ यूएईमध्ये आयपीएलचे उर्वरित सामने खेळणार आहे. त्यामुळेच भन्नाट फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूंनाच या हायव्होल्टेज सामन्यामध्ये अंतिम ११ खेळाडूंच्या यादीत स्थान दिलं जाईल. काही खेळाडूंची जागा तर पाकिस्ताविरोधात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात ठरलेली आहे. यामध्ये रोहित शर्मा हा सलामीचा फलंदाज असेल हे जवळजवळ निश्चित आहे. मात्र त्यासोबत के. एल. राहुल किंवा ईशान किशन यापैकी एक पर्याय कोहली आणि संघ व्यवस्थापनाला निवडता येईल.
नक्की वाचा >> T20 World Cup : टीम इंडियामध्ये मुंबई इंडियन्सचा दबदबा, एक दोन नाही तर तब्बल ६ खेळाडूंना मिळाली संधी
राहुल आणि ईशानची कामगिरी कशी राहिली आहे?
राहुल हा विश्वासार्हता असणारा फलंदाज आहे तर दुसरीकडे किशन हा आक्रामक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. दोन्ही खेळाडूंनी मागील वर्षी यूएईमध्ये खेळलेल्या आयपीएलमध्ये ५०० हून अधिक धावा केल्यात. नुकत्याच झालेल्या आय़पीएल २०२१ मध्ये इशानला त्याची लय गवसली नव्हती. तर राहुलने सात सामन्यांमध्ये चार अर्धशतकांच्या जोरावर ३३१ धावांचा पाऊस पाडला. इंग्लडच्या दौऱ्यामध्येही राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. राहुल आणि ईशानची आकडेवारी पाहता राहुलचं पारडं सध्या तरी जड दिसत आहे.
नक्की वाचा >> T20 World Cup: निवृत्तीनंतरही टीम इंडियामध्ये धोनीचं ‘सिलेक्शन’; ‘या’ निर्णयामागील रजनीकांत कनेक्शन माहितीय का?
गोलंदाजीची धुरा कोणाच्या खांद्यावर?
मधल्या फळीमध्ये विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांची जागा निश्चित मानली जात आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणजून रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याला संघात स्थान दिलं जाणं जवळजवळ निश्चित आहे. जलद गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा पाकिस्तानी फलंदाजांना क्रीजवर उभं राहणं मुश्कील करण्यासाठी सज्ज असतील. तर फिरकीच्या जाळ्यात पाकिस्तानी संघाला अडकवण्याच्या उद्देशाने अश्विन आणि वरुण चक्रवर्तीला स्थान दिलं जाईल असं मानलं जात आहे. अश्विनने आयपीएलमध्ये खेळताना यूएईच्या खेळपट्ट्यांवर १३ तर वरुणने १७ बळी घेतलेत.
नक्की पाहा हे फोटो >> आईच्या भीतीपोटी लागलेल्या सवयीमुळे बुमरा आज झालाय ‘यॉर्कर किंग’
पाकिस्तानविरोधातील संभाव्य संघ असा असू शकतो
> फलंदाज : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल किंवा ईशान किशन, सूर्यकुमार यादव
> यष्टीरक्षक : ऋषभ पंत
> अष्टपैलू : हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा
> वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार
नक्की वाचा >> समजून घ्या : बुमराच्या घातक यॉर्करमागील तंत्र; कोणत्याही फलंदाजाला क्रीज टीकून राहणंही का होतं मुश्कील?
> फिरकीपटू : रविचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती