दुबई : सलामीच्या लढतीत पराभव पत्करलेले दक्षिण आफ्रिका आणि गतविजेता वेस्ट इंडिज हे संघ ट्वेन्टी-२० विश्वचषकात मंगळवारी ‘अव्वल-१२’ फेरीमध्ये आमनेसामने येणार असून दोन्ही संघांतील फलंदाजांचे कामगिरीत सुधारणा करण्याचे लक्ष्य असेल. पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाने पाच गडी राखून पराभूत केले, तर इंग्लंडने विंडीजचा सहा गडी राखून धुव्वा उडवला होता. दोन्ही संघांना चांगली धावसंख्या उभारण्यात अपयश आले. आफ्रिकेचा संघ २० षटकांत केवळ ११८ धावा करू शकला. विंडीज संघ ५५ धावांत गारद झाला. आता दोन्ही संघांच्या फलंदाजांची दुबईच्या खेळपट्टीवर कसोटी लागणार आहे.

’ वेळ : दुपारी ३.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी

Story img Loader