पर्थ : डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘अव्वल १२’ फेरीत शनिवारी अफगाणिस्तानला पाच गडी आणि ११ चेंडू राखून पराभूत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला ११२ धावांत गुंडाळल्यावर इंग्लंडने १८.१ षटकांत ५ बाद ११३ धावा करत विजय साकारला. इंग्लंडकडून करनने (३.४-१०-५) अप्रतिम गोलंदाजी केली. फलंदाजीत लियाम लििव्हगस्टोनने २१ चेंडूंत नाबाद २९ धावांचे योगदान दिले.इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांपुढे अफगाणिस्तानचे फलंदाज अडखळताना दिसले. पण अफगाणिस्तानची फिरकी गोलंदाजी इंग्लंडला रोखू शकली नाही. जोस बटलर (१८) आणि ॲआलेक्स हेल्स (१९) यांनी संयमी सुरुवात करून दिली. त्यानंतर फटकेबाजीच्या मोहात इंग्लंडचे फलंदाज बाद झाले. मात्र, लिव्हगस्टोने इंग्लंडचा विजय सुनिश्चित केला.

संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान : १९.४ षटकांत सर्वबाद ११२ (इब्राहिम झादरान ३२, उस्मान घनी ३०; सॅम करन ५/१०, बेन स्टोक्स २/१९) पराभूत वि. इंग्लंड : १८.१ षटकांत ५ बाद ११३ (लियाम लिव्हगस्टोन नाबाद २९; मोहम्मद नबी १/१६)