टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होत आहे. दोन्हीही संघ तूल्यबळ असल्यामुळे आजची लढत चांगलीच अटीतटीची होत आहे. दरम्यान, भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव चांगलाच तळपला आहे. त्याने धडाकेबाज फलंदाजी करत एकूण ६८ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघाचा सलामीवीर असलेला केएल राहुलने मात्र आजच्या सामन्यातही निराशा केली. तो अवघ्या ९ धावा करू शकला. याच कारणामुळे समाजमाध्यमांवर केएल राहुलवर टीका होत आहे. काही नेटकऱ्यांनी मजेदार मीम्स शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> IND vs SA: टीम इंडियाचा तळपता सूर्या! सूर्यकुमार यादवने सांगितलं तुफानी खेळीचं गुपित, म्हणाला, “मी रबरी बॉल..”

केएल राहुल नेदरलँड्सविरोधातील सामन्यात अवघ्या ९ धावा करू शकला. तर पाकिस्तानविरोधातील सामन्यातही त्याने फक्त ४ धावा केल्या. त्यामुळे आजच्या सामन्यात तो चांगली खेळी करेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र आजदेखील त्याने निराशा केली. त्याने १४ चेंडूंमध्ये अवघ्या ९ धावा केल्या. त्याच्या खराब कामगिरीचा संघालाही फटका बसला. भारतीय संघ २० षटकांत अवघ्या १३३ धावा करू शकला. याच कारणामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

हेही वाचा >>> T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात उतरताच रोहित शर्माने मोडला दिलशानचा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले काही मीम्स :

दरम्यान, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १३४ धावांचे लक्ष्य ठेवले. आजच्या सामन्यात टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज खास कामगिरी करू शकले नाहीत. केएल राहुलने ९ धावा केल्या. तर रोहित शर्मा अवघ्या १५ धावा करू शकला. मागील काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केलेला विराट कोहलीदेखील धावा करू शकला नाही. त्याने १२ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने संघाला सावरत ६८ धावांची अर्धशतकी खेळी केली.