जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाशिवाय अनेक देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. १ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. यादरम्यान अफगाणिस्तान संघाने आपल्या संघासह आयपीएल स्टारला संघाचा गोलंदाज सल्लागार म्हणून नेमले आहे.

अफगाणिस्तानने वेस्ट इंडिडचा माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्होला टी-२० विश्वचषकासाठी संघाचा गोलंदाजी सल्लागार म्हणून निवडले असल्याची घोषणा केली. ब्राव्हो हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. सीएसकेचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून ड्वेन ब्राव्होचा रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. आता अफगाणिस्तानने त्याला संघाच्या प्रशिक्षक वर्गाचा भाग केल्याने संघाच्या गोलंदाजी आक्रमणाची बाजू अधिक बळकट झाली आहे.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?

हेही वाचा – IPL 2024: हरभजनने ‘या’ खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या सुमार कामगिरीचं खापर; म्हणाला, “हार्दिकची काही चूक नाही…”

ड्वेन ब्राव्होची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूपच चमकदार आहे. त्याने २९५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६४२३ धावा केल्या आहेत. तर ३६३ विकेटही त्याच्या नावावर आहेत. ड्वेन ब्राव्होला जगभरातील अनेक लीगमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. त्याचबरोबर त्याने दोन टी-२० विश्वचषकही जिंकले आहेत. त्याच्या अनुभवाचा अफगाणिस्तान संघाला आगामी वर्ल्डकपमध्ये नक्कीच फायदेशीर ठरेल. ब्राव्होने ५७३ सामन्यात ६२५ विकेट घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने ६९७५ धावा केल्या आहेत. टी-२० विश्वचषकाशिवाय ब्राव्होने आयपीएल, सीपीएल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसह अनेक विजेतेपदे जिंकली आहेत.

T20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ
राशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम जादरान, अजमतुल्ला ओमरझाई, नजीबुल्ला जादरान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोटी, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारूकी आणि फरीद अहमद मलिक .
राखीव – सेदिक अटल, हजरतुल्ला झाझई, सलीम साफी

T20 विश्वचषक लीग टप्प्यासाठी अफगाणिस्तानचे वेळापत्रक
अफगाणिस्तान विरुद्ध युगांडा – ४ जून २०२४
अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड – ८ जून २०२४
अफगाणिस्तान वि पापुआ न्यू गिनी – १४ जून २०२४
अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज – १८ जून २०२४