T20 World Cup 2024: भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली टी-२० विश्वचषक संघातून वगळला जाऊ शकतो, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. असे वृत्त टेलिग्राफने दिले होते आणि नंतर ते वणव्यासारखे पसरले. पण आता माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांच्या एक्सवरील पोस्टमुळे चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीबाबत म्हणाला की, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विराट कोहली संघात हवा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– quiz

भारताच्या १९८३ विश्वचषक संघातील माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी ट्विटरवर कोहलीचा फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. कोहलीचा फोटो शेअर करताना कीर्ती आझाद यांनी मोठी माहिती दिली आहे. पोस्टमध्ये किर्ती आझाद म्हणाले, “विराट कोहलीला टी-२० संघात संधी मिळत नसल्याबद्दल इतर निवडकर्त्यांशी बोलण्याची आणि त्यांनी समजावण्याची जबाबदारी अजित आगरकर यांना दिली होती. त्यासाठी १५ मार्चपर्यंतची वेळही देण्यात आली होती. सूत्रांच्या मते अजित आगरकर यासाठी ना निवडकर्त्यांना विराटबद्दल समजवू शकले ना स्वत:ला पटवून देऊ शकले. जय शाह यांनी रोहितला विराटबद्दल विचारलं; तेव्हा रोहित म्हणाला, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विराट कोहली संघात हवा; आहे. विराट कोहली टी-२० विश्वचषक खेळणार आणि याची अधिकारिक घोषणा संघनिवडीपूर्वी केली जाईल.”

विराट कोहली हे नाव जागतिक क्रिकेटमधील किती मोठे आणि महत्त्वाचे नाव आहे, याचा अंदाज सर्वांनाच आहे, विराटने त्याच्या तडाखबंद फलंदाजीच्या जोरावर अनेकदा भारतासाठी एकहाती सामने जिंकले आहेत. याचं ज्वलंत उदाहरण मागील टी-२० विश्वचषकातीलच आहे. गेल्या टी-२० विश्वचषकातही कोहली संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

हेही वाचा: २०२३ च्या विश्वचषकापूर्वी खेळपट्टीशी छेडछाड? रोहित शर्मा, द्रविडचे नाव घेत कैफचा मोठा दावा

२०२२ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयात विराट कोहलीचे योगदान कोणीच विसरू शकणार नाही. असे असूनही, कोहलीला आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये संघाचा भाग नसल्याच्या बातम्या येत होत्या. पण या बातम्यांदरम्यान रोहित शर्माच्या एका वाक्यातून म्हणजे सर्वांच्या मनातील भावना व्यक्त झाल्या आहेत.