Terror Threat to T20 World Cup 2024: २ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, स्पर्धेचे सह-यजमान वेस्ट इंडिजला उत्तर पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. २ ते २९ जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या यजमानपदाखाली टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. महिनाभर सुरू असणाऱ्या या स्पर्धेत प्रथमच २० संघ खेळवले जाणार आहेत. या हल्ल्यांच्या वृत्तावर क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्हज यांनी वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘प्रो-इस्लामिक स्टेटने विश्वचषकादरम्यान हल्ल्याची योजना आखली आहे. आयएस संघटनेच्या अफगाणिस्तान-पाकिस्तान शाखेकडून एक व्हिडिओ संदेश पाठवण्यात आला आहे, ज्यामध्ये त्यांनी काही देशांमध्ये हल्ले करणार असल्याचा उल्लेख केला आहे आणि समर्थकांना सामील होण्याचे आवाहनही केले आहे.

क्रिकेट वेस्ट इंडीजचे सीईओ जॉनी ग्रेव्हज यांनी रविवारी क्रिकबझला सांगितले: “आम्ही यजमान देश आणि शहरांच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहोत. आम्ही सर्वांना खात्री देऊ इच्छितो की आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेतील प्रत्येकाची सुरक्षा ही आमची पहिली जबाबदारी आहे आणि आमच्याकडे सर्वसमावेशक आणि मजबूत सुरक्षा योजना आहे.’

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.