आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ येत्या १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या यजमानपदाखाली खेळवली जाणार आहे. यावेळी टी-२० विश्वचषकात २० संघ सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये अमेरिकेचा नावाचा देखील समावेश आहे जे प्रथमच या स्पर्धेचा भाग असतील. अमेरिकेने आपला टी-२० वर्ल्डकपसाठीचा संघ जाहीर केला आहे. या संघात निम्मे खेळाडू हे भारतीय वंशाचे आहेत. तर न्यूझीलंड संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू वर्ल्डकपमध्ये अमेरिकेकडून खेळताना दिसेल.

न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू टी-२० वर्ल्डकप अमेरिकेकडून खेळणार

टी-२० विश्वचषक २०२४ साठी अमेरिकेच्या संघात अष्टपैलू कोरी अँडरसनचा समावेश करण्यात आला आहे. कोरी अँडरसनने न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. त्याने न्यूझीलंडसाठी एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धाही खेळल्या आहेत. २०१५ मध्ये अंतिम सामना खेळलेल्या न्यूझीलंड संघाचा तो भाग होता. पण काही काळापूर्वी त्याने न्यूझीलंड संघ सोडून अमेरिकेच्या संघात जाण्याचा निर्णय घेतला होता आणि आता तो टी-२० विश्वचषकात अमेरिकेकडून खेळताना दिसणार आहे.

KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू

अँडरसनच्या उपस्थितीसह अमेरिकेचा संघ अधिक मजबूत असल्याचे दिसत आहे. यासोबतच अमेरिकेच्या संघात अनेक भारतीय वंशाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मोनांक पटेल हा अमेरिकेच्या संघाचा कर्णधार आहे. मोनांक पटेल हा भारतीय असून त्याचा जन्म गुजरातमधील आहे. तर फलंदाज मिलिंद कुमार हा २०१८-१९ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने सिक्कीम संघाचे प्रतिनिधीत्त्व करताना १३३१ धावा केल्या. अमेरिकेसाठी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भागही होता.

मुंबईचा माजी डावखुरा फिरकीपटू हरमीत सिंगलाही संघात स्थान मिळाले आहे. मुंबईत जन्मलेल्या ३१ वर्षीय खेळाडूने २०१२ च्या अंडर-१९ विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २०१३ मध्ये तो राजस्थान रॉयल्स आणि त्रिपुरासाठी राज्यासाठी क्रिकेटही खेळला. भारताकडून अंडर-१९ विश्वचषक संघात खेळलेला सौरभ नेत्रावळकरही अमेरिकेच्या संघात आहे.२०१० च्या अंडर-१९ विश्वचषकात लोकेश राहुल, जयदेव उनाडकट आणि मयंक अग्रवाल यांचा समावेश असलेल्या संघाचा तो भाग होता. भारतासाठी अंडर-१९ विश्वचषक (२०१२) खेळलेले उन्मुक्त चंद आणि स्मित पटेल (यष्टीरक्षक) सारखे खेळाडू संघात स्थान मिळवू शकले नाहीत.

टी-२० विश्वचषकासाठी अमेरिकेचा संघ:
मोनांक पटेल (कर्णधार आणि यष्टिरक्षक),अॅरोन जोन्स (उपकर्णधार), अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केंजिगे, सौरभ नेत्रावलकर, शेडली व्हॅन शाल्कविक, स्टीव्हन टेलर आणि शायन जहांगीर.