T20 World Cup SA vs NED: टी २० विश्वचषकात नेदरलँड्सने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत सगळं चित्रच पालटलं आहे. दक्षिण अफ्रिकेचा त्याच्या तुलनेत दुबळा संघ असणाऱ्या नेदरलँडच्या संघाने पराभव केल्याने क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेदरलँडच्या गोलंदाजांनी जबरदस्त खेळी करत १३ धावांनी दक्षिण अफ्रिकेवर विजय मिळवला. यानंतर क्रिकेट वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू ए बी डेव्हिलियर्सनेही ट्वीट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेदरलँडने प्रथम फलंदाजी करत १५८ धावा केल्या होत्या. नेदर्लंडच्या कॉलिनने ४१ धावांची नाबाद खेळी खेळली. १५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँडच्या गोलंदाजीचा फटका दक्षिण आफ्रिकेला बसला. दक्षिण अफ्रिकेला शेवटच्या षटकामध्ये ६ चेंडूंमध्ये २६ धावा हव्या होत्या. मात्र दक्षिण अफ्रिकेच्या संघाला केवळ १२ धावा करता आल्या आणि १३ धावांनी हा सामना गमावला.

SA vs NED: नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेवर अभूतपूर्व विजय; उपांत्य फेरीत पाकिस्तानची संधी वाढली, आता फक्त..

World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधीच भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश; नेदरलँड्सनं जाताजाता दिलं ‘गिफ्ट’

दक्षिण अफ्रिकेच्या पराभवानंतर ए बी डेव्हिलियर्सने ट्वीट केलं असून आपल्या खेळाडूंसाठी वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसंच नेदरलँडस् संघाने कौतुक केलं आहे.

पाकिस्तान उपांत्यफेरीत?

नेदरलँड्सविरोधातील पराभवानंतर आता दक्षिण अफ्रिकेच्या संघाला उपांत्य फेरीत जाण्यासाठी पाकिस्तानच्या खेळावर अवलंबून राहावं लागणार आहे. आज पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश या सामन्यात जर बांग्लादेशचा विजय झाला तर दक्षिण आफ्रिका पाच गुणांसह उपांत्यफेरीत दाखल होईल. तर पाकिस्तान नेट रन रेट अधिक असूनही विश्वचषकातून एका गुणाच्या फरकाने बाहेर पडेल. मात्र जर पाकिस्तानचा विजय झाला तर सहा गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचेल व थेट उपांत्य फेरीत दाखल होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup ab de villiers tweets after netherlands beats south africa sgy