बांगलादेश संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज नुरूल हसन याने भारतीय क्रिकेटर विराट कोहलीवर खोटं क्षेत्ररक्षण (Fake Fielding) केल्याचा आरोप केला आहे. मैदानातील पंचांचं याकडे लक्ष गेलं नाही आणि आम्हाला पेनाल्टीच्या स्वरुपात मिळू शकणाऱ्या पाच धावा आम्ही गमावल्या असंही त्याने म्हटलं आहे. पावसामुळे बांगलादेशला १६ षटकांमध्ये १५१ धावा करण्याचं आव्हान होतं. कर्णधार शाकिब अल हसनने आपण चांगल्या पद्दतीने खेळल्याची भावना व्यक्त केल्या. मात्र नुरूल हसन याने पंचांवर नाराजी जाहीर केली आहे.

नुरुलने शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगला एक चौकार आणि षटकार लगावत विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. पण पाच धावांनी त्यांनी हा सामना गमावला आणि सोबत उपांत्यफेरीत पोहोचण्याची शक्यताही धुसर झाली आहे. “पावसामुळे नक्कीच आमच्या खेळावर परिणाम झाला. पण यावेळी एक खोटा थ्रो करण्यात आला, ज्यामुळे आम्हाला पाच अतिरिक्त धावा मिळाल्या असत्या,” असं नुरुलने म्हटलं आहे.

Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Sam Konstas Reveals Chat with Virat Kohli After On Field Collision Between them
Konstas on Virat Kohli: धक्काबुक्की प्रकरणानंतर कॉन्स्टासने घेतली कोहलीची भेट, म्हणाला; “विराट कोहली माझा आदर्श…”
IND vs AUS Virat Kohli shows empty Pockets to Aussie Fans Reminding them of Sandpaper Scandal video viral
IND vs AUS : ‘माझा खिसा रिकामा…’, विराटशी पंगा घेणे ऑस्ट्रेलियन चाहत्यांना पडले महागात, सँडपेपर प्रकरणाची करून दिली आठवण
Virat Kohli Angry After Getting Out and Punches Himself in Frustration After Same Dismissal Video
IND vs AUS: विराट कोहलीचा बाद होताच सुटला संयम, झेलबाद झाल्याचे पाहताच स्वत:वरच संतापला अन्… VIDEO व्हायरल
nana patekar is fan of virat kohli
विराट कोहलीचे चाहते आहेत नाना पाटेकर; म्हणाले, “तो लवकर बाद झाल्यास माझी भूक…”
IND vs AUS You cannot drop your captain Mohammad Kaif slams after Rohit Sharma not playing Sydney Test
IND vs AUS : ‘विराट कोहलीही…’, रोहित शर्माच्या बाहेर होण्यावर माजी खेळाडू मोहम्मद कैफने व्यक्त केला संताप; म्हणाला, ‘कर्णधार म्हणून…’
IND vs AUS Virat Kohli did not hit a single four in his first tine 69 ball innings in Test cricket career in Sydney
IND vs AUS : विराट कोहलीचा लाजिरवाणा विक्रम! कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच असं घडलं

नेमकं काय झालं?

नुरुल ज्या क्षणाचा उल्लेख करत आहे तेव्हा सातवं षटक टाकलं जात होतं. अर्शदीपने यष्टीरक्षक दिनेश कार्तिककडे चेंडू फेकलेला असताना विराट कोहलीने आपल्या हातात चेंडू आला असून गोलंदाजाच्या दिशेने रन आऊटसाठी फेकत असल्याचं खोटं नाटक केलं होतं.

विश्लेषण: भारताने बांगलादेशविरुद्ध विजय कसा खेचून आणला? उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित का?

यावेळी लिट्टन आणि नजमूल मैदानात होते. त्यांनी यावेळी कोहलीकडे पाहिलंदेखील नव्हतं. त्यामुळे नुरुलच्या आरोपांनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आयसीसी नियम काय सांगतो?

आयसीसी नियम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जाणूनबुजून लक्ष विचलित करणं, फसवणूक करणं किंवा फलंदाजाला अडथळा करण्यापासून प्रतिबंधित करतो. जर पंचांना असं झाल्याचं आढळलं तर ते डेड बॉल जाहीर करु शकतात किंवा पाच पेनाल्टी धावा देऊ शकतात.

T20 World Cup 2022: ‘हीच आमची व्यथा आहे…’भारतविरुद्ध पराभव झाल्यावर शकीब अल हसनने व्यक्त केल्या भावना

पण जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा बांगलादेशचा कोणताही फलंदाज विचलित झाल्याचं किंवा अडथळा आल्याचं आढललं नाही. दोन्ही फलंदाज कोहलीकडे पाहतही नव्हते. यामुळे नुरुलच्या आरोपावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याउलट पंचांवर टीका केल्यामुळे त्याच्यावरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

Story img Loader