टी-२० वर्ल्डकपच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियामध्ये असणारा भारतीय संघ नाराज असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळत आहे. सराव करण्यासाठी दिलेलं मैदान आणि जेवणावरुन भारतीय संघ नाराज आहे. नाराज भारतीय संघाने सराव करण्यासही नकार दिल्याचं समजत आहे. गुरुवारी भारतीय संघाचा नेदरलँडशी सामना होणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानात हा सामना पार पडणार आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडनीमध्ये सरावानंतर दिल्या जाणाऱ्या जेवणावर भारतीय संघ नाराज आहे. गरम जेवण दिलं जात नसल्याने खेळाडूंनी नाराजी जाहीर केली आहे. जेवणामध्ये फक्त सँडविचचा समावेश आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया

“खड्ड्यात गेली खिलाडूवृत्ती,” हार्दिक पांड्याने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला “जर नियम आहे तर…”

“भारतीय संघाला पुरवण्यात आलेलं जेवण चांगलं नाही. त्यांना फक्त सँडविच देण्यात आलं. त्यांनी आयसीसीकडे यासंबंधी तक्रार केली असून जेवण थंड आणि चांगलं नव्हतं असं कळवलं आहे,” अशी माहिती बीसीसीआय सूत्राने दिली आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान, आयसीसीकडे जेवण पुरवण्याची जबाबदारी असते.

सराव करण्यासही नकार

दरम्यान भारतीय संघाने सरावातही सहभाग घेतलेला नाही. कारण, भारतीय संघाला सरावासाठी देण्यात आलेलं ब्लॅकटाउनमधील मैदान हॉटेलपासून ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

बीसीसीआयच्या सूत्राने सांगितल्यानुसार, “भारतीय संघ सरावातही सहभागी झालेला नाही. सरावासाठी त्यांना ब्लॅकटाउनमधील मैदान देण्यात आलं होतं. पण राहत असलेल्या हॉटेलपासून हे मैदान ४५ मिनिटांच्या अंतरावर असल्याने भारतीय संघाने सराव करण्यास नकार दिला आहे”.

पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ आता नेदरलँडशी भिडणार आहे. २७ ऑक्टोबरल सिडनी क्रिकेट मैदानात दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. नेदरलँडचा पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा मानस आहे.

Story img Loader