टी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा पराभव करत इंग्लंड संघाने उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे. इंग्लडच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दरम्यान, या विजयासोबतच इंग्लंड संघ गट १ मधील गुणतालिकेत न्यूझीलंडसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघ २० षटकांमध्ये फक्त १४१ धावाच करु शकला. धावांचा पाठलाग करताना अ‍ॅलेक्स हेल्सने फटकेबाजी करत ४७ धावा केल्याने इंग्लंड संघ विजय मिळत गुणतालिकेतील आपलं स्थान कायम ठेवू शकला.

सामन्याच्या शेवटी बेन स्टोक्सने ३६ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या आणि दोन चेंडू राखत संघाला विजय मिळवून दिला. पण हेल्सने केलेली खेळी यावेळी सर्वात महत्वाची ठरली.

“Ouch!…,” नेदरलँड्सने केलेल्या पराभवानंतर ए बी डेव्हिलियर्सचं ट्वीट, म्हणाला “आमच्या खेळांडूसाठी वाईट…”

सामना संपल्यानंतर हेल्सने स्काय स्पोर्ट्सला मुलाकत दिला. मात्र यावेळी इंग्लंडचा माजी कर्णधार मॉर्गन शेजारी उभा असल्याने हेल्स थोडासा अस्वस्थ होता. या संपूर्ण मुलाखतीदरम्यान त्याने एकदाही मॉर्गनकडे पाहिलं नाही. त्याने माजी कर्णधाराला दुर्लक्षित केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मुलाखतीत मॉर्गननेही प्रश्न विचारणं टाळलं.

ट्विटरवर चर्चांना उधाण

हेल्स २०१९ विश्वचषक स्पर्धेवेळी उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोन वेळा अपयशी ठरला होता. यानंतर त्याच्यावर २१ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मॉर्गन कर्णधार असताना कसोटी संघातही हेल्सला स्थान देण्यात आलं नव्हतं.

मात्र मॉर्गन निवृत्त झाल्यानंतर हेल्सला पुन्हा संघात स्थान देण्यात आलं होतं. पाकिस्तानविरोधातील टी-२० मालिकेसाठी त्याला संधी देण्यात आली होती.

इंग्लंड संघ १० नोव्हेंबरला उपांत्य फेरीतील सामना खेळणार आहे. गट २ मधील विजेत्यांसोबत त्यांचा सामना होईल.

Story img Loader