टी-२० विश्वकरंडक २०२१ स्पर्धेत चाहत्यांना चित्तथरारक उपांत्य फेरीचा सामना अनुभवायला मिळाला. २०१९च्या विश्वविजेतेपदाची हुलकावणी मिळालेल्या न्यूझीलंडने इंग्लंडसोबत हिशोब चुकता करत अंतिम फेरीत प्रवेश नोंदवला. पूर्वार्ध आणि मध्यांतरात पूर्णपणे इंग्लंडच्या हाती असलेला सामना जिमी नीशम आणि सलामीवीर डॅरिल मिशेलला फिरवला. अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हिड मलान आणि मोईन अली यांनी केलेल्या उपयुक्त खेळींमुळे इंग्लंडने २० षटकात ४ बाद १६६ धावा केल्या. मलानचे अर्धशतक हुकले, पण अलीने नाबाद ५१ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने संथ सुरुवात करत महत्वाच्या विकेट गमावल्या. पण डेव्हॉन कॉन्वे, डॅरिल मिशेल आणि जिमी नीशन यांनी जबरदस्त फलंदाजी केली. शेवटच्या ५ षटकात न्यूझीलंडला ६० धावांची गरज होती, पण त्यांनी ४ षटकातच लक्ष्य गाठले आणि सामना ५ गडी राखून जिंकला. नाबाद ७२ धावांची खेळी केलेल्या मिशेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. न्यूझीलंडने पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश नोंदवला आहे.

न्यूझीलंडचा डाव

मार्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली, पण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने पहिल्याच षटकात गप्टिलला (४) झेलबाद केले. गप्टिलनंतर कप्तान केन विल्यमसनलाही वोक्सने तिसऱ्या षटकात तंबूत धाडले. या पडझडीनंतर डेव्हॉन कॉन्वे आणि डॅरिल मिशेलने संघाला आधार दिला. नवव्या षटकात न्यूझीलंडने अर्धशतकी पल्ला ओलांडला. १४व्या षटकात न्यूझीलंडने कॉन्वेला गमावले. लिव्हिंगस्टोनला मोठा फटका खेळण्याच्या नादात कॉन्वे यष्टीचीत झाला. त्याने ५ चौकार आणि एक षटकारासह ४६ धावा केल्या. १५व्या षटकात न्यूझीलंडने शतक पूर्ण केले. १६व्या षटकात न्यूझीलंडने ग्लेन फिलिप्सला गमावल्यानंतर जिमी नीशम मैदानात आला. त्याने दबाव दूर करत फटकेबाजी केली. न्यूझीलंडला २४ चेंडूत ५७ धावांची गरज असताना नीशमने जॉर्डनला २३ धावा ठोकल्या. १८व्या षटकात मिशेलने रशीदला षटकार ठोकत अर्धशतक फलकावर लावले. याच षटकात न्यूझीलंडने नीशमला गमावले. त्याने ११ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह २७ धावा केल्या. न्यूझीलंडला १२ चेंडूत २० धावांची गरज असताना मिशेलने ख्रिस वोक्सच्य १९व्या षटकात २० धावा ठोकल्या. मिशेलने ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७२ धावा केल्या.

हेही वाचा – टी २० वर्ल्डकपनंतर न्यूझीलंडचा भारत दौरा; सामने कधी कुठे होणार?, वाचा

इंग्लंडचा डाव

इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांनी ३७ धावांची सलामी दिली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात इंग्लंडला पहिला धक्का बसला. वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेने बेअरस्टोला (१३) विल्यमसनकरवी झेलबाद केले. बेअरस्टोनंतर डेव्हिड मलान मैदानात आला. आठव्या षटकात इंग्लंडने अर्धशतक पूर्ण केले. पुढच्याच षटकात फिरकीपटू ईश सोधीने बटलरला पायचीत पकडले. बटलरला ४ चौकारांसह २९ धावा करता आल्या. सलामीवीर माघारी परतल्यानंतर मलानने मोईन अलीला सोबत घेत किल्ला लढवला. १४ षटकात इंग्लंडने शतक पूर्ण केले. मलान आणि अली यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. साऊदीने मलानचे अर्धशतक हुकवले. १६व्या षटकात मलान माघारी परतला. मलानने ४ चौकार आणि एका षटकारासह ४२ धावा केल्या. शेवटच्या षटकात इंग्लंडने लिव्हिंगस्टोनला गमावले. नीशमने त्याला झेलबाद केले. याच षटकात मोईन अलीने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. २० षटकात इंग्लंडने ४ बाद १६६ धावा केल्या.

Live Updates
23:13 (IST) 10 Nov 2021
न्यूझीलंड फायनलमध्ये

१९व्या षटकात मिशेलने वेगवान गोलंदाज वोक्सला २० धावा कुटत सामना आपल्या नावावर केला. मिशेलने ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७२ धावा केल्या.

22:56 (IST) 10 Nov 2021
मिशेलचे अर्धशतक

१८व्या षटकात मिशेलने रशीदला षटकार ठोकत अर्धशतक फलकावर लावले. याच षटकात न्यूझीलंडने नीशमला गमावले. त्याने ११ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह २७ धावा केल्या. १८ षटकात न्यूझीलंडने ५ बाद १४७ धावा केल्या. न्यूझीलंडला १२ चेंडूत २० धावांची गरज आहे. नीशमनंतर मिचेल सँटनर मैदानात आला आहे.

22:51 (IST) 10 Nov 2021
न्यूझीलंडला १८ चेंडूत ३४ धावांची गरज

इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने १७वे षटक टाकले. त्याचे हे सर्वात महागडे षटक ठरले. जिमी नीशमने जॉर्डनला २३ धावा ठोकल्या. न्यूझीलंडला १८ चेंडूत ३४ धावांची गरज आहे.

22:41 (IST) 10 Nov 2021
न्यूझीलंडला २४ चेंडूत...

न्यूझीलंडला २४ चेंडूत ५७ धावांची गरज

22:39 (IST) 10 Nov 2021
न्यूझीलंडचा चौथा गडी तंबूत

१६व्या षटकात न्यूझीलंडने ग्लेन फिलिप्सला गमावले. लिव्हिंगस्टोनने त्याला माघारी पाठवले. फिलिप्सनंतर जेम्स नीशम मैदानात आला आहे.

22:36 (IST) 10 Nov 2021
न्यूझीलंडचे शतक पूर्ण

१५व्या षटकात न्यूझीलंडने शतक पूर्ण केले. १५ षटकात त्यांनी ३ बाद १०७ धावा केल्या.

22:30 (IST) 10 Nov 2021
कॉन्वे माघारी

१४व्या षटकात न्यूझीलंडने कॉन्वेला गमावले. लिव्हिंगस्टोनला मोठा फटका खेळण्याच्या नादात कॉन्वे यष्टीचीत झाला. त्याने ५ चौकार आणि एक षटकारासह ४६ धावा केल्या. १४ षटकात न्यूझीलंडने ३ बाद ९७ धावा केल्या. कॉन्वेनंतर ग्लेन फिलिप्स मैदानात आला आहे.

22:21 (IST) 10 Nov 2021
१२ षटकात न्यूझीलंड

१२ षटकात न्यूझीलंडने २ बाद ८० धावा केल्या आहेत. कॉन्वे ४० तर मिशेल २८ धावांवर नाबाद आहे. न्यूझीलंडला अजून ४८ चेंडूत ८७ धावांची गरज आहे.

22:08 (IST) 10 Nov 2021
न्यूझीलंडचे अर्धशतक

नवव्या षटकात न्यूझीलंडने अर्धशतकी पल्ला ओलांडला. कॉन्वे आणि मिशेल यांनी न्यूझीलंडच्या डावाला आधार दिला. १० षटकात न्यूझीलंडने २ बाद ५८ धावा केल्या.

21:51 (IST) 10 Nov 2021
पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंड

पहिल्या सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडने २ बाद ३६ धावा केल्या.

21:48 (IST) 10 Nov 2021
पाच षटकात न्यूझीलंड

पाच षटकात न्यूझीलंडने २ बाद २६ धावा केल्या.

21:37 (IST) 10 Nov 2021
न्यूझीलंडला जबर धक्का

तिसऱ्या षटकात वोक्सने न्यूझीलंडला जबर धक्का दिला. त्याने कप्तान विल्यमसनला (५) स्वस्तात माघारी धाडले. ३ षटकात न्यूझीलंडने २ बाद १३ धावा केल्या. डेव्हॉन कॉन्वे मैदानात आला आहे.

21:26 (IST) 10 Nov 2021
पहिल्याच षटकात न्यूझीलंडला धक्का

मार्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली, पण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने पहिल्याच षटकात गप्टिलला (४) झेलबाद केले. गप्टिलनंतर कप्तान केन विल्यमसन मैदानात आला आहे. पहिल्या षटकात न्यूझीलंडने १ बाद ८ धावा केल्या.

21:13 (IST) 10 Nov 2021
२० षटकात इंग्लंड

शेवटच्या षटकात इंग्लंडने लिव्हिंगस्टोनला गमावले. नीशमने त्याला झेलबाद केले. याच षटकात मोईन अलीने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. २० षटकात इंग्लंडने ४ बाद १६६ धावा केल्या.

21:05 (IST) 10 Nov 2021
१९ षटकात इंग्लंड

१९ षटकात इंग्लंडने ३ बाद १५५ धावा केल्या.

21:00 (IST) 10 Nov 2021
१८ षटकात इंग्लंड

१८ षटकात इंग्लंडने ३ बाद १४६ धावा केल्या.

20:47 (IST) 10 Nov 2021
इंग्लंडला तिसरा धक्का

१६व्या षटकात मलान माघारी परतला. साऊदीने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. मलानने ४ चौकार आणि एका षटकारासह ४२ धावा केल्या.

20:44 (IST) 10 Nov 2021
इंग्लंडचे शतक

१४ षटकात इंग्लंडने शतक पूर्ण केले. मलान आणि अली यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. १५ षटकात इंग्लंडने २ बाद ११० धावा केल्या.

20:37 (IST) 10 Nov 2021
१३ षटकात इंग्लंड

१३ षटकात इंग्लंडने २ बाद ९४ धावा केल्या. मलान ३० तर अली १५ धावांवर नाबाद आहे.

20:22 (IST) 10 Nov 2021
१० षटकात इंग्लंड

१० षटकात इंग्लंडने २ बाद ६७ धावा केल्या. मलान १५ तर अली ४ धावांवर नाबाद आहे.

20:15 (IST) 10 Nov 2021
नऊ षटकात इंग्लंड

बटलरनंतर मोईन अली मैदानात आला आहे. नऊ षटकात इंग्लंडने २ बाद ६० धावा केल्या.

20:12 (IST) 10 Nov 2021
इंग्लंडचे अर्धशतक, बटलर माघारी

आठव्या षटकात इंग्लंडने अर्धशतक पूर्ण केले. पुढच्याच षटकात फिरकीपटू ईश सोधीने बटलरला पायचीत पकडले. बटलरला ४ चौकारांसह २९ धावा करता आल्या.

19:57 (IST) 10 Nov 2021
पॉवरप्लेमध्ये इंग्लंड

पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात इंग्लंडला पहिला धक्का बसला. वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेने बेअरस्टोला (१३) विल्यमसनकरवी झेलबाद केले. बेअरस्टोनंतर डेव्हिड मलान मैदानात आला आहे. सहा षटकात इंग्लंडने १ बाद ४० धावा केल्या.

19:55 (IST) 10 Nov 2021
पाच षटकात इंग्लंड

पाच षटकात इंग्लंडने बिनबाद ३७ धावा केल्या.

19:55 (IST) 10 Nov 2021
चार षटकात इंग्लंड

चौथ्या षटकात बटलरने इंग्लंडचा पहिला चौकार ठोकला. या षटकात इंग्लंडने १६ धावा ठोकल्या. चार षटकात इंग्लंडने बिनबाद २९ धावा केल्या.

19:41 (IST) 10 Nov 2021
सामन्याला सुरुवात

इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो मैदानात आले आहेत. २ षटकात इंग्लंडने बिनबाद १२ धावा केल्या.

19:38 (IST) 10 Nov 2021
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

इंग्लंड - जोस बटलर (यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, मोईन अली, इऑन मॉर्गन (कप्तान), सॅम बिलिंग्ज, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, मार्क वुड, आदिल रशीद.

न्यूझीलंड - मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, केन विल्यमसन (कप्तान), डेव्हन कॉनवे (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, टिम साऊदी, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट.

19:05 (IST) 10 Nov 2021
विल्यमसननं जिंकला टॉस!

न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

17:54 (IST) 10 Nov 2021
टॉसची वेळ

सायंकाळी ७ वाजता टॉस होणार आहे.

Story img Loader