टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सुपर १२ मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. याआधी टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध कधीही सामना गमावला नव्हता. दुबईमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या सलामीवीरांच्या कामगिरीमुळे पाकिस्तानने हा हाय व्होल्टेज सामना जिंकला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकचाा एक व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला.

या सामन्यात शोएब मलिकला फलंदाजी किंवा गोलंदाजीची संधी मिळाली नाही. जेव्हा तो क्षेत्ररक्षणासाठी सीमारेषेवर पोहोचला, तेव्हा भारतीय चाहत्यांनी त्याला जिजाजी-जिजाजी म्हटले. शोएबनेही त्यांना हसून उत्तर दिले. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणात व्यस्त झाला.

हेही वाचा – T20 WC : …तर सेमीफायनपूर्वीच स्पर्धेबाहेर जाणार टीम इंडिया! पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळं बिघडलं गणित

भारतीय महिला टेनिस स्टार सानिया मिर्झाशी लग्न केल्यानंतर चाहते शोएबला मेहुणा म्हणून संबोधतात. सानियाने हा व्हिडिओ रिट्विट करताना दोन हसणारे इमोजी आणि दोन हार्ट पोस्ट केले आहेत. शोएबला चाहत्यांनी जिजाजी म्हणून हाक मारण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही चाहत्यांनी असे केले आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ४९ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५७ धावा केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २९वे अर्धशतक आणि ऋषभ पंतसोबत(३९) चौथ्या विकेटसाठी ५३ धावांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाने ७ बाद १५१ अशी आव्हानात्मक धावसंख्या गाठली. पण पाक फलंदाजांनी ही धावसंख्या सहज पार केली.

Story img Loader