टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने शेवटच्या चेंडूवर केलेल्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते संघावर प्रचंड संतापले आहेत. मेलबर्न क्रिकेट मैदानात झालेल्या सामन्यात भारताने अटीतटीची लढत देत विजयी सुरुवात केली आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाच्या पराभवानंतर पुन्हा एकदा बाबर आझमच्या कर्णधारपदावरुन चर्चा रंगली आहे. पाकिस्तानचे माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीज यांनीही बाबर आझमला लक्ष्य केलं असून टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाकिस्तानने १६० धावांचं आव्हान दिलं असताना भारताने चार गडी राखून हा सामना जिंकला. अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता. विराट कोहली (५३ चेंडूंमध्ये ८२ धावा) या सामन्याच खरा हिरो ठरला. एकीकडे सोशल मीडियावर विराट कोहलीवर स्तुतीसुमनं उधळली जात असताना बाबर आझमला मात्र टीकेला सामोरं जावं लागत आहे.

“बाबर आझमचं कर्णधारपद म्हणजे पवित्र गाईसारखं आहे, ज्याच्यावर टीका केली जाऊ शकत नाही. सलग तिसऱ्या मोठ्या सामन्यात त्याच्या कर्णधारपदात त्रुटी जाणवत आहेत. पण तो ३२ वर्षांचा होईपर्यंतही आपण तो शिकत आहे असं ऐकत राहू,” असा टोला मोहम्मद हाफीजने लगावला आहे.

“या सामन्यात सातव्या ते ११ व्या षटकापर्यंत भारतीय संघ धावा करण्यासाठी संघर्ष करत होता. एका षटकात चार धावाही होत नव्हत्या. मग बाबरने फिरकी गोलंदाजांकडे चेंडू देऊन त्यांची षटके पूर्ण का केली नाहीत?,” अशी विचारणा मोहम्मद हाफीज यांनी केली आहे.

सामना संपल्यानंतर बाबर आझमने आपल्या गोलंदाजांचं कौतुक केलं होतं. तसंच विराट कोहलीने ज्याप्रकारे फलंदाजी केली आणि सामना आपल्या संघाच्या हातून खेचून नेला याचीही त्याने स्तुती केली.

“आमच्या गोलंदाजांनी चांगली खेळी केली. पण विराट कोहली आणि पांड्याला सर्व श्रेय आहे. नवी चेंडूसोबत खेळणं सोपं नसतं. १० व्या षटकानंतर आमची भागीदारी झाली होती. आमच्याकडे संधी होती. आम्ही तशी योजनाही आखली होती. पण विराट कोहलीला सर्व श्रेय आहे. आम्ही मधल्या षटकांमध्ये विकेट मिळवत फिरकी गोलंदाजांना परत आणायचं असं ठरवलं होतं. आमच्या खेळीत अनेक सकारात्मक गोष्टी आहेत,” असं बाबर आझमने सांगितलं.