मेलबर्न क्रिकेट मैदानावर रविवारी (२३ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तानमध्ये रोमहर्षक लढत झाली. या लढतीत भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने दिमाखदार खेळी करत पाकिस्तानच्या हातून विजय खेचून आणला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर चार गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या या दिमाखदार विजयामुळे भारतभरातून विराट कोहली तसेच टीम इंडियाचे कौतुक केले जात आहे. दरम्यान बॉलिवुडचा बादशाह म्हणून ओळख असलेल्या शाहरुख खानने क्रिकेटचा किंग असलेल्या विराट कोहलीला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> IND Vs PAK: भारताने चीटिंग केली पण आम्ही…; पाकिस्तानची रडारड सुरु; या Viral Tweets वर तुमचं मत काय?

शाहरुख खानची विराटसाठी खास पोस्ट

भारताची विजयी कामगिरी आणि विराटची खेळी पाहून खूप छान वाटले. त्याने उत्तम फलंदाजी केली. विराटला मैदानात रडताना आणि हसताना पाहून तसेच मागे ‘चक दे इंडिया’ हे गाणे सुरू असतानाचा क्षण प्रेरणादायी होता. आता आनंदी दिवाळीची सुरुवात झाली आहे, असे शाहरूख खान आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.

भारताच्या या विजयानंतर राजकीय नेत्यांनीही भारतीय संघ आणि विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसेचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी भारताच्या विजयानंतर आनंद व्यक्त केला.

हेही वाचा >>> पाकिस्तानला नमवत टीम इंडियाचा धमाकेदार विजय, अमित शाहांसह देशातील नेत्यांनी दिल्या खास शुभेच्छा!

दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने ही धावसंख्या चार गडी राखत गाठली. भारतीय संघाकडून विराट कोहलीने दमदार खेळ केला. त्याने ५३ चेंडूंमएध्ये ६ चौकार आणि ४ षटकार यांच्या मदतीने नाबाद ८२ धावा केल्या.