टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पराभव केल्याने पाकिस्तान संघाचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न भंगलं. यानंतर पाकिस्तान संघावर टीका होत असून अनेक माजी खेळाडूही आपलं मत व्यक्त करत आहेत. यादरम्यान, पाकिस्तान सघाचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी विदेशी प्रशिक्षकांचा मुद्दा उपस्थित केला असून त्यावर आक्षेप नोंदवला आहे. विदेशी प्रशिक्षक आणल्याने माजी खेळाडूंना राष्ट्रीय संघाचा भाग होण्याची संधी मिळत नाही असं मत त्यांना मांडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तान संघ व्यवस्थापनाची मानसिकता त्यांच्या खेळाडूंचं भविष्य असुरक्षित करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. भूतकाळात अशाच गोष्टी फिक्सिंगसाठी कारणीभूत ठरल्या होत्या असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

मोहम्मद रिझवानने मैदानावर नमाज पठण केल्याने संतापला पाकचा माजी क्रिकेटपटू; म्हणाला…..

अँकरने जेव्हा फिलंदरदेखील गतवर्षी वर्ल्डकप संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये असल्याचं नमूद केलं तेव्हा मियाँदाद संतापले. ते म्हणाले “मग त्यांना स्टुडिओत घेऊन या. आम्ही त्यांना प्रश्न विचारु. त्यांना क्रिकेटबद्दल काय माहिती आहे हे आम्हालाही जाणून घ्यायचं आहे”. बोर्ड अशा नियुक्त्या करुन आपला बचाव करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, यावेळी मियाँदाद यांनी मॅच फिक्सिंगबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. “आपल्या लोकांकडे पाहा, त्यांनी जे क्रिकेट खेळलं आहे ते पाहा. मी माझ्याबद्दल बोलत नाही आहे. मला भूतकाळात अनेक ऑफर्स आल्या होत्या, पण मी गेलो नाही. पण आज जे खेळाडू खेळत आहेत त्यांचं भविष्य काय आहे? मी आज चांगली कामगिरी केली नाही तर काहीच संधी मिळणार नाही हे त्यांना माहिती आहे. याच कारणामुळे फिक्सिंग झाली होती. प्रत्येकाला आपलं करिअर संपेल अशी भीती वाटत होती,” असा खुलासा जावेद मियाँदाद यांनी केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup javed miandad revelation on match fixing after pakistan defeated by england t20 world cup loss sgy