टीम इंडिया टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. २४ ऑक्टोबर रोजी भारताला पाकिस्तानचा सामना करायचा आहे. दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील पहिला सामना आहे. यादरम्यानच पाकिस्तान भारताविरुद्ध कोणते खेळाडू मैदानात उतरवणार याचे उत्तर मिळाले आहे. पाक संघ तीन वेगवान गोलंदाजांसह सामन्यात उतरू शकतो. याशिवाय ४ अष्टपैलू खेळाडू खेळू शकतात. म्हणजेच एकूण ७ गोलंदाज सामन्यात प्रवेश करू शकतात. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा संघ कधीही टीम इंडियाला हरवू शकलेला नाही.
जिओ टीव्हीशी बोलताना, टीमच्या एका सूत्राने सांगितले, “संघ या सामन्यात वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडूंसह खेळेल. जर फिटनेसची समस्या नसेल, तर केवळ सराव सामन्यातील संघ भारताविरुद्ध खेळेल.” वेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यात बाबरने अर्धशतक केले, तर फखरने ४६ धावांची आक्रमक खेळी खेळली.
हेही वाचा – T20 WC: “मी रम पीत होतो आणि…”, मायकेल वॉनचं जाफरच्या ट्वीटला चोख प्रत्युत्तर!
सूत्राने सांगितले की, शादाब खान आणि इमाद वसीम अष्टपैलू म्हणून खेळू शकतात. उपकर्णधार आणि लेगस्पिनर शादाब खानने वेस्ट इंडिजविरुद्ध २ षटकांत ७ धावा दिल्या. दुसरीकडे, डावखुरा फिरकी गोलंदाज इमादने ३ षटकांत फक्त ६ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. शाहीन शाह आफ्रिदी, हसन हाली आणि हरीस रौफ हे वेगवान गोलंदाज म्हणून खेळू शकतात. तिन्ही वेगवान गोलंदाजांनी वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
भारताविरुद्ध पाकिस्तानची अशी असू शकते प्लेईंग इलेव्हन
बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह आफ्रिदी, हसन हली आणि हरीस रौफ.