T20 World Cup 2024 Rohit Sharma Press Conference: आगामी टी-२० विश्वचषकासाठी ३० एप्रिल रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. येत्या २ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघाने रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद दिले आहे. तर हार्दिक पंड्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. या टी-२० विश्वचषक निवडीबाबत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांची पत्रकार परिषद झाली आणि संघाबाबत त्यांनी बऱ्आच प्रश्नांची उत्तरही दिली.
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील संघात दोन स्पेशालिस्ट फलंदाज, विकेटकीपर, ४ फिरकीपटू आणि ३ वेगवान गोलंदाज आहेत. संघ निवडीबाबत रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी अनेक प्रश्नांची उत्तर देत शंकाचे निरसन केले. संघात चार फिरकीपटू का याबाबत उत्तर देताना रोहितने त्याचे उत्तर नंतर देईन आणि यामागे टेक्निकल मुद्दाही असल्याचे त्याने सांगितले. यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर मात्र रोहितने आपल्या स्टाईलने दिले.
हेही वाचा – T20 World Cup मधील टीम इंडियाचे सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता खेळवले जाणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
टी-२० वर्ल्डकपच्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा काय म्हणाला?
रोहितला पुढील प्रश्न विचारण्यात आला की टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळताना बुमराहसोबत नवा चेंडू कोणत्या गोलंदाजाकडे सोपवणार अर्शदीप की सिराजकडे? यावर रोहितने भन्नाट उत्तर दिले, रोहित म्हणाला, “५ तारखेला मॅच आहे, आताच सांगून काय करू? आपण बघू संघ. आताच संघ संयोजन ऐकून काय करायचंय?”
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.