2024 T20 World Cup : अमेरिकेत चाललेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला नवख्या युएसए संघाकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. काल (६ जून) झालेल्या अटीतटीच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये युएसएच्या संघाने पाकिस्तानवर मात केली. या सामन्यात मराठमोळा जलदगती गोलंदाज सौरभ नेत्रावळकर सामन्याचा हिरो ठरला. सुपर ओव्हरमध्ये सौरभने टीच्चून मारा करत पाकिस्तानला रोखले आणि एक बळीही घेतला. पाकिस्तानचा पाच धावांनी पराभव झाल्यानंतर आता सोशल मीडियावर पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली जात आहे. यूएसएने या स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाणेफेक जिंकून युएसएचा कर्णधार मोनांक पटेलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने सात बळी गमावून १५९ धावा केल्या. तर या आव्हानाचा पाठलाग करत असताना युएसएने २० षटकात तीन गडी गमावून १५९ धावांपर्यंत मजल मारली. दोन्ही संघाची समान धावसंख्या झाल्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली. युएसएने प्रथम फलंदाजी करताना १८ धावा चोपल्या. पाकिस्तानसमोर १९ धावांचे लक्ष्य असताना सौरभ नेत्रावळकरच्या गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला.

USA vs PAK: मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरमुळे पाकिस्तानवर अमेरिकेचा रोमहर्षक विजय

युएसएच्या विजयानंतर जगभरातील क्रिकेट चाहते युएसएच्या संघाचे आणि सौरभ नेत्रावळकरचे कौतुक करत आहेत. भारतीय संघाचा तडाखेबाज फलंदाज सुर्यकुमार यादवनेही सौरभसाठी एक पोस्ट लिहिली. सामना जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करतानाचा नेत्रावळकर आणि हरमीत सिंग यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यावर सुर्यकुमारने लिहिले, “तुला मानलं भाऊ. तू आणि तुझ्या कुटुंबाबद्दल आनंद वाटतो.”

सुर्यकुमार यादव आणि सौरभ नेत्रावळकरने याआधी रणजी करंडकसाठी मुंबईत एकत्र क्रिकेट खेळलेले आहे. युएसएमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याआधी सौरभने मुंबईत स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या खेळाची चुणूक दाखविली होती.

कोण आहे सौरभ नेत्रावळकर?

सौरभ नेत्रावळकर हा मुळचा मुंबईचा असून तो पेशाने इंजीनियर आहे. सौरभ हा भारताच्या २०१० मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील वर्ल्डकप संघाचा भाग होता, ज्यामध्ये तो केएल राहुल, हर्षल पटेलसारख्या खेळाडूंसह खेळला आहे. यानंतर मुंबईकडून रणजी ट्रॉफीही तो खेळला आहे. पण सौरभ आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळतो.

T20 WC 2024: मुंबईचा मराठमोळा इंजिनियर कसा झाला अमेरिकेचा फास्ट बॉलर; आता भारताविरुद्धच परजणार अस्त्रं

मालाडमध्ये राहणारा सौरभ लहानपणी गल्ली क्रिकेट खेळत असे. सौरभचे बाबा हे टेनिस क्रिकेट प्रचंड खेळायचे. त्यामुळे क्रिकेटचे अगदी सर्व सामने घरी बघितले जायचे, बिल्डिंगमध्ये सुरूवातीला सौरभ रबर बॉलने क्रिकेट खेळायचा. वडिलांसोबत आणि बिल्डिंगमधल्या मित्रांसोबतच सौरभने क्रिकेटचे धडे गिरवले. सौरभ १० वर्षांचा असताना त्याचे बाबा त्याला चर्चगेटमधील ओव्हल मैदानावर वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या निवडीसाठी घेऊन गेले होते आणि तिथून त्याच्या व्यावसायिक क्रिकेटला सुरूवात झाली. या निवडीत वेगवान गोलंदाज म्हणून सौरभची निवड झाली. यानंतर चांगली कामगिरी करत पुढे अंडर-१३ पासून ते अंडर-१९ पर्यंत सौरभने मजल मारली.