एकीकडे आशिया चषक स्पर्धेची धूम सुरू असताना टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी केली जात आहे. येत्या १६ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. याआधी आयसीसीने सराव सामन्यांची घोषणा केली आहे. येत्या १० ऑक्टोबरपासून सराव सामन्यांची सुरुवात होणार असून भारताची लढत यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडशी अनुक्रमे १७ आणि १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा>>> Dubai Stadium Fire : मोठी बातमी! भारत-अफगाणिस्तान सामन्याआधी दुबई स्टेडियम परिसरात मोठी आग

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीच्या सराव सामन्यांची सुरुवात येत्या १० ऑक्टोबरपासून होत आहे. या सामन्यांमध्ये भारत १७ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाशी लढणार आहे. हा सामना गाबा येथे होणार आहे. तर १९ ऑक्टोबर रोजी भारताची लढत न्यूझीलंडसोबत याच मैदानावर होणार आहे. आयसीसीने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार टी-२० विश्वचषकात भाग घेणारे सर्व १६ संघ प्रत्येकी दोन सराव सामने खेळतील.

हेही वाचा>>> पाकिस्तानच्या क्रिकेटरला भारताच्या ‘डिंपल गर्ल’ची भुरळ, खास फोटो शेअर करत म्हणाला; “माझी सर्वांत…”

ICC पुरुष T-२० विश्वचषक २०२२ चे सराव सामन्यांचे वेळापत्रक

१० ऑक्टोबर – वेस्ट इंडिज विरुद्ध यूएई

१० ऑक्टोबर – स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड

१० ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे

११ ऑक्टोबर – नामिबिया विरुद्ध आयर्लंड

१२ ऑक्टोबर – वेस्ट इंडिज विरुद्ध नेदरलँड्स

१३ ऑक्टोबर – झिम्बाब्वे विरुद्ध नामिबिया

१३ ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध आयर्लंड

१३ ऑक्टोबर: स्कॉटलंड विरुद्ध यूएई

१७ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, गाबा

१७ ऑक्टोबर, अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश

१७ ऑक्टोबर, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

१७ ऑक्टोबर, इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, गाबा

१९ ऑक्टोबर, अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान

१९ ऑक्टोबर बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका

१९ ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध भारत, गाबा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup warm up matches schedule announced india will play against australia and new zealand prd