पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२२ साठी राष्ट्रीय संघाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना पाकिस्तानचे मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीम यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या दहा महिन्यांत भारताविरुद्धच्या काही महत्त्वाच्या संघर्षांत पाकिस्तानने कशी चांगली कामगिरी केली याचे उदाहरण त्यांनी दिले.
पाकिस्तानने गुरुवारी, १५ सप्टेंबर रोजी त्यांच्या १५ जणांच्या संघाची घोषणा केली आणि मधल्या फळीतील समस्यांकडे लक्ष न दिल्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका झाली. आशिया चषक २०२२ मधील अंतिम सामन्यासह पाकिस्तानच्या मधल्या फळीतील कमकुवता तीनदा दिसली. अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर ४ सामन्यात १३० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ग्रीन ब्रिगेडही अडचणीत सापडली.
हेही वाचा : भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी महत्वाच्या मालिकेपूर्वी संघातून दुखापतीमुळे बाहेर
पत्रकारांशी बोलताना वसीम म्हणाला, ‘भारत हा एक अब्ज डॉलरचा संघ आहे, पण आम्ही गेल्या वर्षी आणि या वर्षीही आशिया चषकमध्ये दाखवून दिले की आमचा संघ जिंकण्यास सक्षम आहे आणि मला खात्री आहे की ते जगातील चाहत्यांना आनंदित करतील. ते पुढे म्हणाले, ‘मला वाटते की आपण गेल्या टी२० विश्वचषकाची उपांत्य फेरी आणि आशिया चषकाची अंतिम फेरी गाठली होती. ती गाठली कारण ज्या सकारात्मक गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित केले होते ते त्याचेच फळ आहे आणि पुढेही असेच त्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यामुळे खराब कामगिरीच्या जोरावर संघाला पूर्णपणे बाहेर फेकणे योग्य ठरणार नाही.
शान मसूद टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात आहे
पाकिस्तानने गुरुवारी आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात शान मसूदचा समावेश केला आहे. तर दुसरीकडे अनुभवी अव्वल फळीतील फलंदाज फखर जमान गुडघ्याच्या दुखापतीमुळे मुख्य संघाबाहेर असेल. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीही तंदुरुस्त झाल्याने त्याने संघात पुनरागमन केले आहे. मसूदने इंग्लंडमधील ‘व्हिटॅलिटी ब्लास्ट टूर्नामेंट’मध्ये डर्बीशायरचे कर्णधार असताना लाल आणि पांढऱ्या चेंडूवर चमकदार कामगिरी केली. गुडघ्याच्या दुखापतीमुळे झमान मुख्य संघात नाही, पण विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे.