T20 World Cup 2020 : ICC आयोजित टी २० महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १० संघांपैकी ८ संघ या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले होते. पात्रता फेरीतील सामन्यांनंतर शेवटचे दोन संघ नक्की करण्यात आले आणि अंतिम कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

T20 World Cup 2020 मध्ये भारताच्या संघाला अ गटात स्थान देण्यात आले आहे. याच गटात तुल्यबळ ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश आणि श्रीलंका हे संघ असणार आहेत. तर ब गटात पाकिस्तानच्या संघाला स्थान देण्यात आले असून त्यांच्या गटात वेस्ट इंडिज, द. आफ्रिका, इंग्लंड आणि थायलंड हे संघ आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पात्रता फेरीत थायलंड आणि बांगलादेश हे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले. त्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने थायलंडला ७० धावांनी पराभूत केली. मात्र पात्रता स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे त्यांना मूळ स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यात आले.