Harbhajan Singh’s reaction on Yuzvendra Chahal : अफगाणिस्तान टी-२० मालिकेसह टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला अंतिम रूप देण्यास सुरुवात केली होती. आयपीएलदरम्यान ही तयारी आणखी मजबूत करावी लागेल. काही खेळाडूंना टी-२० विश्वचषक संघासाठी आधीच चिन्हांकित केले गेले आहेत. आता काही खेळाडूं आयपीएल कामगिरीच्या आधारे संघात स्थान मिळवतील. अशा स्थितीत या स्पर्धेसाठी कोणत्या खेळाडूंना तिकीट मिळणार याची चर्चा सुरू आहे. या क्रमाने, माजी फिरकीपटू हरभजन सिंगला जेव्हा टी-२० संघासाठी तीन फिरकी गोलंदाजांची निवड करण्यास सांगण्यात आले, तेव्हा त्याने सर्वप्रथम युजवेंद्र चहलचे नाव घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या युझवेंद्र चहलची फार कमी चर्चा आहे. आयपीएलच्या जवळपास प्रत्येक मोसमात चमकदार गोलंदाजी करूनही गेल्या काही वर्षांपासून तो टीम इंडियामध्ये नियमित स्थान मिळवू शकलेला नाही. यावेळीही त्याला टी-२० वर्ल्डमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. संघाच्या शर्यतीत त्याचे नाव दिसत नाही. इथे फक्त कुलदीप यादव, रवी बिश्नोई, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांचीच चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत हरभजन सिंगनेही चहलबाबत मोठी टिप्पणी केली आहे.

हरभजन सिंग युजवेंद्र चहलबद्दल काय म्हणाला?

यूएईमध्ये खेळल्या जाणार्‍या आयएल टी-२० च्या प्रसंगी गप्पा मारताना हरभजन सिंग म्हणाला, “मी प्रथम युजवेंद्र चहलला टी-२० वर्ल्ड कप संघात ठेवणार आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हे असे का आहे हे मला माहित नाही. त्यालाही हे माहीत नसेल. पण आज देशात त्याच्यापेक्षा चांगला लेगस्पिनर नाही. त्याच्यापेक्षा धाडसी फिरकी गोलंदाज कोणी असेल असे मला वाटत नाही. त्याचे अतिशय चाणाक्ष आहे.” हरभजन सिंग पुढे म्हणाला, “दुसरा फिरकीपटू म्हणून मी रवींद्र जडेजाची निवड करेन. तुम्हाला ऑफस्पिनरचीही गरज आहे आणि वॉशिंग्टन सुंदर त्यासाठी योग्य आहे. आता निवडकर्ते काय विचार करतात, संघ व्यवस्थापन काय विचार करते ही वेगळी गोष्ट आहे.”

हेही वाचा – IND vs ENG : ‘जडेजा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही’, केविन पीटरसनने इंग्लंडला दिला भारतीय फिरकीपटूला सामोरे जाण्याचा मंत्र

“तिथल्या खेळपट्ट्या भारतासारख्या असतील” –

यूएसए आणि वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्यांमधून फिरकीपटूंना महत्त्वपूर्ण मदत मिळेल, असा विश्वास भारताचा माजी ऑफस्पिनर आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला आपल्या फिरकी आक्रमणावर अधिक जोर देण्याची गरज आहे. तो म्हणाला, “तिथल्या खेळपट्ट्या भारतासारख्या असतील. फिरकीपटू मोठी भूमिका बजावतील. मी अनेक प्रसंगी वेस्ट इंडिजला गेलो आहे आणि माझ्या लक्षात आले आहे की फिरकीपटूंना नेहमी काहीतरी ऑफर असते. त्यामुळे योग्य गोलंदाज निवडणे महत्त्वाचे आहे. आपण परिस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही कारण ती उपखंडासारखीच असेल. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन संघ बनवावा लागेल. तुम्हाला संघात किमान तीन फिरकीपटू ठेवण्याची गरज आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talking about harbhajan singh yuzvendra chahal he has been consistently ignored by the indian selection committee vbm
Show comments