Sourav Ganguly on Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुलीने अलीकडेच कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतबद्दल माहिती दिली. आयपीएलसमोर असताना गांगुलीसाठी सर्वात कठीण आव्हानांपैकी एक म्हणजे ऋषभ पंतची जागा भरणे. जो एका भीषण अपघातात जखमी होऊन नंतर शस्त्रक्रिया करूनही उपलब्ध नाही. दिल्ली कॅपिटल्समध्ये त्याच्या जागी कोणाचा समावेश होणार? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, मात्र लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते.
शस्त्रक्रियेनंतर कठीण काळातून जात आहे –
गांगुली म्हणाला, “मी त्याच्याशी अनेकदा बोललो. दुखापती आणि शस्त्रक्रियांनंतर तो साहजिकच कठीण काळातून जात आहे. मी तो बरा होण्यासाठी प्रार्थना करतोय. एका वर्षात किंवा दोन वर्षांत तो पुन्हा भारतासाठी खेळेल.”
पंतला आयपीएलदरम्यान काही काळ संघासोबत पाहायला आवडेल का?, जेणेकरून त्याला तंदुरुस्त होण्यास मदत होईल. यावर तो म्हणाला, “माहित नाही. आम्ही बघू. हे जाणून घेण्यासाठी आम्हाला अजून थोडा वेळ हवा आहे. पुढील शिबिर आयपीएलच्या आधी सुरू होईल. आयपीएलला फक्त एक महिना बाकी आहे.”
पंतऐवजी संघात कोणाला स्थान मिळणार?
याबाबत गांगुली म्हणाला, दिल्ली संघाने ऋषभ पंतच्या बदलीची घोषणा करणे बाकी आहे. अद्याप युवा अभिषेक पोरेल आणि अनुभवी शेल्डन जॅक्सन यांच्यामध्ये कोण चांगले आहे हे ठरवायचे आहे. या हंगामात ऑस्ट्रेलियन डेव्हिड वॉर्नर कर्णधार आणि अक्षर पटेल उपकर्णधार असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Sourav Ganguly: ‘जर भारतात धावा केल्या नाहीत, तर…’, सौरव गांगुलीने केएल राहुलला दिला इशारा
गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता येथे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पृथ्वी शॉ, इशांत शर्मा, चेतन साकारिया, मनीष पांडे आणि इतर देशांतर्गत खेळाडू सहभागी झाले होते. तो म्हणाला, ”आयपीएलला अजून एक महिना बाकी आहे आणि हंगाम नुकताच सुरू झाला आहे. ते जितके क्रिकेट खेळतात, ते पाहता सर्व खेळाडूंना एकत्र आणणे अवघड आहे. चार-पाच खेळाडू इराणी ट्रॉफी खेळत आहेत. सरफराजच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याच्या बोटात फ्रॅक्चर नाही. त्यामुळे आशा आहे की तो आयपीएलपर्यंत बरा होईल.