Harbhajan Sreesanth Controversy: इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात असे अनेक वाद झाले आहेत, जे क्रिकेट चाहते आजपर्यंत विसरू शकलेले नाहीत. यापैकी एक आहे हरभजन सिंग आणि एस श्रीशांत यांच्यातील वाद, जो अनेक महिने चर्चेचा विषय राहिला होता. हरभजन सिंग आणि एस श्रीशांत त्यांच्यातील वाद अजूनही खूप चर्चेत आहे. यावर आता १६ वर्षांनंतर वेगवान गोलंदाज श्रीशांतने प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर त्याने हरभजन आणि त्याच्यातील नात्याबद्दल सांगितले आहे
वास्तविक हा वाद पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यादरम्यान झाला होता. आयपीएल २००८ मध्ये जेव्हा मुंबईचा संघ सामना हरला, तेव्हा ऑफस्पिनर हरभजन सिंगने आपला संयम गमावला आणि श्रीसंतला कानाखाली मारली. परिणामी हरभजन सिंगवर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली.
माध्यमांनी एक किरकोळ गैरसमज वाढवून सांगितला –
मात्र, या घटनेनंतर अनेक वर्षांनी हरभजन सिंगने श्रीशांतसमोर आपली चूक मान्य केली. त्याने सांगितले की ही चूक त्या चुकांपैकी एक आहे जी त्याला सुधारायला आवडेल. आता अलीकडेच, या घटनेच्या १६ वर्षांनंतर माजी वेगवान गोलंदाज श्रीशांतने यावर खुलेपणाने बोलला आहे. त्याने सांगितले की एक छोटासा गैरसमज होता, जो मीडियाने वाढवून सर्वांसमोर सादर केला.
स्पोर्ट्स यारीशी बोलताना श्रीशांत म्हणाला, तो नेहमीच हरभजन सिंगचा मित्र होता आणि त्याने त्याच्याकडून (हरभजन सिंग) कॉमेंट्रीच्या अनेक युक्त्याही शिकल्या. या घटनेबद्दल बोलताना श्रीशांत म्हणाला की, आम्ही नेहमीच मित्र आहोत. हा केवळ गैरसमज होता आणि मीडियाने त्यातून मोठा गाजावाजा केला.
हेही वाचा – Suryakumar Yadav: टी-२० मधील हिरो सूर्या वनडेत झिरो; चाहत्यांकडून ‘या’ खेळाडूला संधी देण्याची होतेय मागणी
तो पुढे म्हणाला की, ”मला एवढेच सांगायचे आहे की भज्जी पा यांनी सुरुवातीपासूनच मला प्रत्येक प्रकारे साथ दिली आहे. मी त्यांच्याकडून काही टिप्सही घेतल्या आहेत. त्यांनी मला खूप पाठिंबा दिला आणि मला खूप मदत केली, मी त्यांचा खूप आभारी आहे.” श्रीशांत पुढे म्हणाला की, ‘तेरे जैसा यार कहा’ हे गाणे आहे ना, त्याप्रमाणेच माझे आणि भज्जीचे नाते आहे.”