World Cup Shakib Al Hasan Tamim Iqbal: बांगलादेशला (बीसीबी) मोठा धक्का बसणार असे दिसते आहे कारण, त्यांचा अष्टपैलू खेळाडू शाकिब-अल-हसन अवघ्या महिन्यापूर्वी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होऊ इच्छित आहे. विश्वचषकापूर्वी बांगलादेशचे दोन महान क्रिकेटपटू तमीम इक्बाल आणि शाकिब-अल-हसन यांच्यात नवीन मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आशिया चषक २०२३ पूर्वी शाकिब-अल-हसनला एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले आणि तो ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत ‘बांगला टायगर्स’चे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. नुकत्याच निवड झालेल्या १५ सदस्यीय विश्वचषक संघाचे नेतृत्व हे शाकिबकडे सोपवण्यात आले असून काही महिन्यांपूर्वी निवृत्ती मागे घेणाऱ्या तमीम इक्बालला वगळले आहे. त्यामुळे बांगलादेश क्रिकेटमध्ये एक नवे संकट उभे ठाकले आहे.
बीसीबीच्या एका सूत्राने डेली स्टारला सांगितले की, शाकिबने देशाच्या क्रिकेट प्रशासकीय समितीला कळवले आहे की प्रतिष्ठित स्पर्धेत संघाचे नेतृत्व करण्याचा त्याचा इरादा नाही. ३६ वर्षीय बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा यांच्यासमवेत मध्यरात्री बीसीबी अध्यक्ष नजमुल हसन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांची परिस्थिती समजावून घेतली. बीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकिबला त्याच्या संघात अर्ध-फिट खेळाडू नको आहेत आणि बांगलादेशचा कर्णधार न होण्यामागे हे एक कारण आहे.
तमीम इक्बाल पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे पण विश्वचषकासाठी बांगलादेशच्या १५ सदस्यीय संघात त्याचा समावेश करण्यात येणार होता पण शाकिबच्या दबावामुळे त्याला वगळण्यात आले आहे. बांगलादेशच्या दोन सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये हे संभाव्य शीतयुद्ध सुरूच आहे. त्यांच्यात तणाव निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
पाठीच्या दुखापतीमुळे आशिया चषक खेळू शकल्यानंतर तमिमने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. २३ सप्टेंबर रोजी मीरपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ५८ चेंडूत ४४ धावा केल्या, पण खेळानंतर तो म्हणाला, “माझ्या पाठीत अजूनही खूप दुखत आहे.” सोमोय टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, तमीमने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (बीसीबी) कळवले की, “दुखापतीमुळे तो विश्वचषकादरम्यान पाचपेक्षा जास्त सामने खेळू शकणार नाही. बीसीबीने तमीमची मागणी मान्य केली असून तो आयसीसी स्पर्धेचा भाग होणार नाही,” असे शाकिबने उत्तर देताना सांगितले.
बांगलादेशच्या आशा या खेळाडूंवर टिकून राहतील…
तमिम इक्बालच्या अनुपस्थितीत बांगलादेशच्या फलंदाजीची जबाबदारी मुशफिकुर रहीम, नझमुल हुसेन शांतो, लिटन दास आणि शाकिब अल हसन या खेळाडूंवर असेल. तर या संघात शाकिब अल हसन, मेहंदी हसन मिराज, नसुम अहमद आणि मेहंदी हसन हे फिरकीचे पर्याय असतील. तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. याशिवाय शरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि तंजीम हसन यांचा १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.
विश्वचषकासाठी बांगलादेशचा १५ सदस्यीय संघ
शाकिब-अल-हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम, लिटन दास (उपकर्णधार), नझमुल हुसैन शांतो, मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, नसुम अहमद, मेहंदी हसन मिराज, तन्झीम हसन साकीब, तन्झीद हसन तमीम आणि महमुदुल्लाह रियाध