Tamim Iqbal announces retirement: एकदिवसीय विश्वचषक २०२३ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे. विश्वचषकाच्या तीन महिन्यांपूर्वी बांगलादेश क्रिकेटमध्ये एक मोठा भूकंप झाला आहे. बांगलादेश वन डे संघाचा कर्णधार तमिम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. यासह ३४ वर्षीय तमिम इक्बालची १६ वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने तमिमच्या वारसदाराचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. सध्या शाकिब अल हसन टी२० फॉरमॅटमध्ये आणि लिटन दास टेस्ट फॉरमॅटमध्ये कर्णधार आहे. त्याच्या या तडकाफडकी निवृत्तीमुळे बांगलादेशच्या संघावर खूप मोठा परिणाम होणार आहे.

बांगलादेश संघाचा अनुभवी डावखुरा सलामीवीर फलंदाज तमीम इक्बाल याने भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अवघ्या तीन महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तमिमने पत्रकार परिषदेत सर्वांना आपल्या निर्णयाची माहिती दिली. बांगलादेश संघाच्या वन डे कर्णधाराने जेव्हा आपला निर्णय जाहीर केला तेव्हा तोही खूप भावूक झाला होता.

siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
S M krushna
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
Aishwarya Narkar Birthday
५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…

पत्रकार परिषदेत तमीम रडायला लागला

बांगलादेशला अफगाणिस्तान विरुद्ध चितगाव येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात १७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, त्यानंतर तमिमने हे पाऊल उचलले आहे. तमिमने गुरुवारी चितगाव येथे पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. यावेळी तमीम खूप भावूक झाला होता आणि त्याचे डोळे पाणावले होते. तमिम म्हणाला, “माझ्यासाठी हा शेवट आहे. मी माझे सर्वोत्तम दिले आहे. याच क्षणापासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असून मी माझे सर्व सहकारी, सपोर्ट स्टाफ, बीसीबी अधिकारी, माझे कुटुंबीय आणि या प्रवासात माझ्यासोबत असलेल्या सर्वांचे आभार मानू इच्छितो. चाहत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांचाही मी खूप आभारी आहे.”

बांगलादेशचा माजी सलामीवीर डावखुरा फलंदाज पुढे म्हणाला की, “मला माझ्या पत्नीचे आभार मानायचे आहेत. तुझे प्रेम आणि विश्वास मला बांगलादेशसाठी माझे सर्वोत्तम देण्यास प्रेरित करत होता. माझ्या आयुष्याच्या पुढील अध्यायासाठी मी तुझा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. कृपया मला तो असाच पुढेही देत राहा.” हे सांगताना तो अधिक भावनिक झाला.

तमिम इक्बालने गेल्या वर्षी याच सुमारास टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याची शेवटची कसोटी यावर्षी एप्रिलमध्ये आयर्लंडविरुद्ध होती आणि त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना अफगाणिस्तानविरुद्ध होता. तमिमने फेब्रुवारी २००७ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच वर्षी, २००७ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध बांगलादेशच्या विजयात सामना जिंकवून देणारी अर्धशतक झळकावत टीम इंडियाला पात्रता फेरीतून बाहेर काढले होते.

तमिम इक्बालची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अशी होती

तमिमने ७० कसोटी सामन्यांमध्ये ३८.८९च्या सरासरीने ५१३४ धावा केल्या ज्यात १० शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर तमिमच्या वनडेत ३६.६२च्या सरासरीने ८३१३ धावा आहेत. तमिमने एकदिवसीय सामन्यांमध्ये १४ शतके आणि ५६ अर्धशतके केली आहेत. तमिमने ७८ टी२०आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २४.०८च्या सरासरीने १७५८ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये तमिमच्या नावावर एक शतक आणि ७ अर्धशतके आहेत.

हेही वाचा: ENG vs AUS: “ब्रॅडमननंतर स्टीव्ह हा…” स्मिथच्या १००व्या कसोटी सामन्यापूर्वी माजी खेळाडू रिकी पाँटिंगचे मोठे विधान

तमिम हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्या देशासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. बांगलादेशचा एकदिवसीय कर्णधार म्हणून तमीमची विजयाची टक्केवारी मशरफी मोर्तझापेक्षा थोडी जास्त आहे. तमिमने त्याच्या नेतृत्वाखाली बांगलादेशला ३७ पैकी २१ सामने जिंकले. तमिमने २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात बांगलादेशचे नेतृत्वही केले होते.

Story img Loader