नवी दिल्ली : भारतीय खेळाडू तन्वी पत्रीने चीनच्या चेंग्दू येथे रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या थि थू हुयेन गुयेनला सरळ गेममध्ये नमवीत आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या १५ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले.

अग्रमानांकित तन्वीने ३४ मिनिटे चाललेल्या सामन्यात दुसऱ्या मानांकित गुयेनवर २२-२०, २१-११ असा विजय नोंदवला. तन्वीच्या या कामगिरीनंतर तिचा सामिया इमाद फारुकी व तस्नीम मीर यांच्या यादीत समावेश झाला आहे. फारुकी व मीर यांनी २०१७ व २०१९ मध्ये १५ वर्षांखालील मुलींच्या गटाचे जेतेपद मिळवले होते.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
phanindra sama success story
Success Story : दोन मित्रांच्या मदतीने ५ लाखांत व्यवसायास प्रारंभ; मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल ७ हजार कोटींचे साम्राज्य
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
World Championship Chess Tournament Dommaraju Gukesh defeats Ding Liren sport news
जगज्जेतेपदाच्या दिशेने गुकेशचे पाऊल; ११व्या डावात डिंगवर मात
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
anmol kharb
अनमोल, सतीशसह अश्विनी-तनिषा अंतिम फेरीत
world chess championship 9th game between d gukesh and ding liren ends in draw
डाव नवा, निकाल तोच! गुकेशच्या प्रयत्नांना अपयशच; सलग सहावी बरोबरी

तन्वीने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले. अंतिम सामन्यातील पहिल्या गेममध्ये तन्वी ११-१७ अशी पिछाडीवर होती. मात्र, तिने व्हिएतनामच्या खेळाडूच्या चुकीचा फायदा उचलत गुणांची कमाई केली व पहिला गेम जिंकला. तन्वीने दुसऱ्या गेममध्ये आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीही संधी दिली नाही आणि गेमसह सामन्यात विजय नोंदवला. भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण व एक कांस्यपदकाची कमाई केली. जी. दत्तूने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कांस्यपदकाची कमाई केली.

हेही वाचा >>> अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात; विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅमचे जोकोविचचे लक्ष्य

‘‘आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी पत्रीने जेतेपद व पुरुषांच्या १७ वर्षांखालील एकेरी गटात जी. दत्तूने कांस्यपदक मिळवत पुन्हा एकदा भारताकडे प्रतिभेची कमतरता नाही हे दाखवून दिले. येणाऱ्या काळातही तन्वी व दत्तू यांच्याप्रमाणे अन्य भारतीय कनिष्ठ खेळाडूही जेतेपद मिळवताना दिसतील, याचा मला विश्वास आहे,’’ असे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस संजय मिश्रा म्हणाले. तन्वीचे आई-वडील रबीनारायण पत्री व शैलबाला पांडा हे सॉफ्टवेयर इंजिनीयर आहेत. ते पूर्वी चीनमध्ये काम करीत होते. तेथेच तन्वीने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. करोनादरम्यान ते सर्व जण भारतात परतले.

तन्वीकडे सिंधूसारखे कौशल्य विमल कुमार

‘‘ती जवळपास आठ ते नऊ वर्षांची असताना भारतात आली आणि २०२२ मध्ये आमच्या अकादमीत आली. तिच्याकडे पाहून मला सिंधूची आठवण येते. सिंधूही कनिष्ठ गटात अशीच खेळायची. कमी वयात सामना जिंकण्याची क्षमता हे चांगले संकेत आहेत. तिला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. ज्याप्रमाणे ती खेळत आहे, त्यानुसार तिच्याकडून अपेक्षा आहेत. ती आपल्या वयोगटातील खेळाडूंच्या खूप पुढे आहे. गेल्या सहा महिन्यांत तिने १७ वर्षांखालील स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच, अनेक वरिष्ठ खेळाडूंनाही पराभूत केले आहे. यामध्ये सध्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या तन्वी शर्माचाही समावेश आहे,’’ असे प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीचे संचालक विमल कुमार यांनी सांगितले.

जेतेपद मिळवल्यानंतर मला आनंद झाला आहे. मला विजयाचा विश्वास होता आणि चांगली कामगिरी करण्यात मी यशस्वी झाले. मी गेली दोन वर्षे बंगळूरुच्या प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. – तन्वी पत्री

Story img Loader