अपेक्षेप्रमाणे आगामी श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजसाठी रोहित शर्माची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हा रोहित शर्मा टी-२०, वन डे बरोबर आता टेस्ट सामन्यातही भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तसंच जसप्रीत बुमराहची उपकर्णधार पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीने चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि टी-२० मालिकांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेत खराब कामगिरी करणाऱ्या संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कसोटी मालिकेसाठी प्रियांक पांचाल याचे पुनरागमन झाले आहे.
चार खेळाडू बाहेरचा रस्ता
कसोटीसाठी टीम निश्चित करतांना चार वरिष्ठ खेळाडूंना वगळले आहे. दक्षिण आफ्रिकेत खराब कामगिरी केलेल्या अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्याबरोबर इंशात शर्मा आणि ऋुद्धिमान साहा यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. या सर्वांची वयं लक्षात घेता आणि संघात पदार्पणासाठी नव्या खेळाडुंची रांग लक्षात घेता वगळलेल्या खेळाडूंना पुन्हा कसोटी संघात स्थान मिळण्याची शक्यता आता दुरापास्त झाली आहे. याआधीच हे सर्व चारही खेळाडू वन डे मधून बाजूला गेले आहेत.
काही खेळाडूंना विश्रांती
विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. या दोन्ही खेळा़डूंना वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) शेवटच्या टी-२० सामन्याआधीच बायो बबलमधून ब्रेक दिला आहे. तर शार्दुल ठाकूरला संपुर्ण मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
टी-२०साठी टीम
रोहित शर्मा ( कर्णधार), जसप्रीत बुमराह ( उपकर्णधार ), ऋुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन, इशांत किशन, वेंकटेश अय्यर, दीपक चहर, दीपक हुडा, रविंद्र जडेजा, चहल, बिष्णोई, कुलदीप यादव, सीराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान
टेस्ट टीम
रोहित शर्मा ( कर्णधार), जसप्रीत बुमराह ( उपकर्णधार ), मयांक अगरवाल, कोहली, श्रेयस अय्यर, हनुमान विहारी, शुभम गिल, ऋषभ पंत, के एस भारथ, जडेजा, जयंत यादव, अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, सिराज, उमेश यादव, शामी