Team India and officials celebrating Virat Kohli and Ravindra Jadeja’s performance: एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ३७ वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ ऑक्टोबर रोजी ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने २४३ धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. संघासाठी किंग कोहलीने शानदार फलंदाजी करताना नाबाद शतक झळकावले. यानंतर रवींद्र जडेजान दमदार गोलंगदाजी करताना ५ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी पाहून बीसीसीआयने ड्रेसिंग रूममध्ये त्यांचे विशेष अभिनंदन केले.
तत्पूर्वी रवींद्र जडेजाने फलंदाजीतही योगदान दिले होते. त्याने १५ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद २९ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना त्याने ९ षटकांत ३५ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी पाहून बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ड्रेसिंग रूममध्ये त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी केकही कापण्यात आला. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
विराटने आफ्रिकेविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये झळकावले ४९ वे शतक –
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करताना त्याने एकूण १२१ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याने ८३.४७ च्या स्ट्राईक रेटने १०१ नाबाद धावा काढल्या. या काळात त्याच्या बॅटमधून १० चौकार आले. या सामन्यादरम्यानच्या खेळीसाठी विराट कोहलीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले. एवढेच नाही तर या सामन्यादरम्यान त्याने एक विशेष कामगिरी केली. किंग कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये सचिनच्या सर्वाधिक शतकांची बरोबरी केली आहे. दोन्ही खेळाडूंच्या नावावर आता वनडेत अनुक्रमे ४९-४९ शतके आहेत.
एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी ५ विकेट्स घेणारा दुसरा फिरकीपटू –
रवींद्र जडेजाने अगोदर फलंदाजीत नाबाद २९ धावांचे योगदान दिले. यानंतर गोलंदाजीत शानदार गोलंदाजी केली. त्याने ३२६ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवून इतिहास रचला. जडेजाने ९ षटकात ३३ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या आणि विश्वचषकाच्या इतिहासात ५ विकेट्स घेणारा दुसरा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला.
हेही वाचा – Ind vs SA: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली-शतकी दीपस्तंभाचे मनसबदार
याआधी युवराज सिंगने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत ही कामगिरी केली होती. गमतीची गोष्ट म्हणजे गेल्या वेळी जेव्हा डावखुरा फिरकीपटू युवराजने विश्वचषकात भारतासाठी ५ विकेट घेतल्या होत्या, तेव्हा तो संघ चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरला होता. विश्वचषकात एका डावात ५ बळी घेणारा जडेजा हा केवळ ७वा भारतीय गोलंदाज आहे. याआधी कपिल देव, रॉबिन सिंग, व्यंकटेश प्रसाद, आशिष नेहरा, युवराज सिंग आणि मोहम्मद शमी यांनी ही कामगिरी केली आहे.