Team India squad announce for Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. हाच संघ इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. या संघाच्या उपकर्णधारपदी युवा खेळाडू शुबमन गिलची वर्णी लागली आहे. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याने त्याच्या जागी हर्षित राणा खेळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मोहम्मद शमी खूप दिवसांनी पुनरागमन झाले आहे. तो २०२४ च्या विश्वचषकानंतरपासून दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. विशेष म्हणजे यशस्वी जैस्वाला पहिल्यादांच वनडे संघात स्था मिळालं आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना १९ फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे. तर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला सामना खेळणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.
भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील संपूर्ण वेळापत्रक –
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपल्या मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. उभय संघांमधील सामना २० फेब्रुवारी रोजी दुबईत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ फेब्रुवारीला सामना होणार आहे. टीम इंडिया २ मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे. जर भारताने गट सामन्यांमध्ये अव्वल स्थान कायम राखले आणि पुढील फेरीत प्रवेश केला तर ४ मार्च रोजी उपांत्य फेरीचा सामना खेळेल. या स्पर्धेचा अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे.
भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने –
२० फेब्रुवारी: भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई
२३ फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
२ मार्च: भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
४ मार्च: उपांत्य फेरी (पात्र ठरल्यास), दुबई
९ मार्च: अंतिम (पात्र असल्यास), दुबई
हेही वाचा – Ranji Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठी अपडेट! विराट कोहली आणि केएल राहुल ‘या’ मोठ्या स्पर्धेला मुकणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे स्वरुप –
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये ८ संघांमध्ये एकूण १५ सामने होणार आहेत. संघांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गट-अ मध्ये आहेत. त्यांच्यासह उर्वरित दोन संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. सर्व ८ संघ आपापल्या गटात ३-३ सामने खेळतील. यानंतर, प्रत्येक गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना दुबईत, तर दुसरा लाहोरमध्ये होणार आहे. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. अशा परिस्थितीत एखादा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तो स्पर्धेत एकूण ५ सामने खेळेल.