India Tour of South Africa squad announced: आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी भेट घेऊन संघाला अंतिम रूप दिले. भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्याची सुरुवात १० डिसेंबर रोजी तीन सामन्यांच्या टी-२० सामन्याने होईल.

सर्व चर्चा आणि शक्यतांना पूर्णविराम देत बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे नेतृत्व करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर के.एल. राहुलकडे वन डेचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. म्हणजेच राहुल एकदिवसीय क्रिकेटचा नवा कर्णधार आणि पुढील विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या योजनेचा एक भाग असू शकतो.

Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

रहाणे कसोटी संघाबाहेर, राहुल-श्रेयसचे पुनरागमन, बुमराह उपकर्णधार

३५ वर्षीय अजिंक्य रहाणेला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात तो विशेष काही करू शकला नाही. दोन कसोटी सामन्यांच्या दोन डावात त्याला केवळ ११ धावा करता आल्या. मात्र, त्याआधी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याने ८९ आणि ४६ धावांची इनिंग खेळली होती. या फायनलमधूनच रहाणेचे कसोटी संघात पुनरागमन झाले. त्यापूर्वी त्याला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नव्हती.

दुसरीकडे, चेतेश्वर पुजारालाही कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. पुजारा शेवटचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना या वर्षी जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यात त्याने दोन डावात १४ आणि २७ धावांची खेळी केली होती. तेव्हापासून तो कसोटी संघातून बाहेर आहे. के.एल. राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. श्रेयसने या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. त्याचवेळी राहुलने या वर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. बुमराहचे तब्बल दीड वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. जुलै २०२२ मध्ये त्याने अखेरची कसोटी इंग्लंडविरुद्ध खेळली होती. त्याचबरोबर बुमराहचीही उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. या काळात दोन्ही संघ तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. भारतीय संघ ६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. टी-२० मालिका १० डिसेंबरपासून, एकदिवसीय मालिका १७ डिसेंबरपासून आणि कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

हेही वाचा: BAN vs NZ: टीम साऊदीने केला नवा विक्रम, कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा खेळाडू

भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा.

शुबमन गिल, रवींद्र जडेजा टी-२० मध्ये पुनरागमन

सूर्यकुमार यादव टी-२० संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. संघात बहुतेक तेच खेळाडू आहेत जे सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात टी-२० मालिका खेळत आहेत.

भारताचा टी-२० संघ:

यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुनील, रवींद्र जडेजा. कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.

साई सुदर्शन, रिंकू वन डेत नवा चेहरा, सॅमसनचे पुनरागमन

वनडे संघात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. के.एल. राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर कुणालाही उपकर्णधारपद देण्यात आलेले नाही. गुजरात टायटन्सकडून खेळणारा डावखुरा फलंदाज साई सुदर्शन याने संघात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर रिंकू सिंगला टी-२० नंतर वन डे संघातही स्थान मिळाले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या रजत पाटीदारलाही संघात स्थान दिले आहे. याआधीही तो टीम इंडियामध्ये सामील झाला आहे, मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहलचेही वन डे संघात पुनरागमन झाले आहे. वन डेमध्ये भारताची वेगवान गोलंदाजी पूर्णपणे नवीन दिसते. सिराज, शमी आणि बुमराह संघात नाहीत. मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चाहर हे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.

भारताचा एकदिवसीय संघ

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, अविनाश कुमार, अर्शदीप सिंग, दीपक चाहर.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

तारीखसामनास्थळ
१० डिसेंबरपहिला टी-२० सामनाडरबन
१२ डिसेंबरदुसरा टी-२० सामनाजीक्यूबेरा
१४ डिसेंबरतिसरा टी-२० सामनाजोहान्सबर्ग
१७ डिसेंबरपहिला एकदिवसीय सामनाजोहान्सबर्ग
१९ डिसेंबरदुसरा एकदिवसीय सामनाजीक्यूबेरा
२१ डिसेंबरतिसरा एकदिवसीय सामनापार्ल
२६-३० डिसेंबरपहिली कसोटीसेंचुरियन
३-७ जानेवारी (२०२४)दुसरी कसोटीकेपटाऊन