BCCI on Pant, Bumrah, Iyer: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातानंतर दुखापतग्रस्त झाला आहे. एनसीएमध्ये तंदुरुस्त होण्यासाठी तो घाम गाळत आहे आणि त्याच्या जलद प्रतिसादामुळे बीसीसीआय आणि बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील वैद्यकीय कर्मचारी आश्चर्यचकित झाले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या भीषण कार अपघातातून वाचल्यानंतर पंतचे पुनर्वसन सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय पंतला संघात घेण्यासाठी त्याच्यावर अहोरात्र मेहनत करत आहे. संघात खेळण्यासाठी त्याला या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु परतण्याची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज श्रेयस अय्यर आता संघात पुनरागमन करण्याच्या मार्गावर आहेत. दोन्ही खेळाडू पाठीच्या दुखापतींशी झगडत होते. त्याचवेळी, शस्त्रक्रियेनंतर, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये सुरू असलेल्या पुनर्वसनामुळे दोन्ही भारतीय खेळाडू त्यांच्या फिटनेसच्या जवळ येत आहेत. अशा परिस्थितीत या दोघांसाठी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत पुनरागमन करणे कठीण वाटत असले तरी आशिया कप २०२३ मध्ये बुमराह आणि श्रेयस अय्यरचे पुनरागमन निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र, २०२३ मध्ये कोणताही क्रिकेट सामना खेळणे पंतसाठी कठीण असेल. नुकतेच त्याने क्रॅचशिवाय चालण्यास सुरुवात केली आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय पायऱ्या चढण्यास सुरुवात केली आहे. यावर भारताचे माजी खेळाडू के. श्रीकांत यांनी सूचक विधान केले आहे.

१९८३च्या विजयी संघांचे खेळाडू श्रीकांत एका कार्यक्रमात म्हणाले, “ बीसीसीआय अपेक्षेपेक्षा जास्त त्याच्याकडून तंदुरस्त होण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे चुकीचे जरी नसले तरी ठराविक हा वेळ लागतोच. त्यामुळे अजून सध्यातरी पंत विश्वचषक खेळू शकत नाही हे गृहीत धरूनच आपण संघाची बांधणी करायला हवी. कर्णधार, संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांनी लवकरात संघाला तयार करणे आवश्यक आहे.”

हेही वाचा: Asian Games 2023: भारताला मोठा धक्का! सुवर्णपदक विजेती हिमा दास आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

पंत दुखातून बऱ्यापैकी सावरला असून आता त्याला या सामन्यासाठी स्वत:ला तयार करावे लागणार आहे. तो सध्या फिजिओ एस. रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या खालच्या शरीराचा आणि वरच्या शरीराच्या गतिशीलतेचा व्यायाम वाढवत आहे. रजनीकांतने यापूर्वी भारतातील विविध वयोगटातील संघांसाठी काम केले आहे आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफचा एक भाग देखील आहे. रजनीकांतने यापूर्वी हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि मुरली विजय यांना गंभीर दुखापतीतून सावरण्यास मदत केली होती. कार अपघातानंतर काही दिवसांनी युवराज पंतला मुंबईत आणले तेव्हापासून आणखी एक एनसीए फिजिओ तुलसी राम त्याच्यासोबत आहे.

पंतचा टेबल टेनिस आणि स्विमिंगवर भर

असे मानले जाते की पंत त्याच्या पुनर्वसनात एक्वा थेरपी, लाइट स्विमिंग आणि टेबल टेनिसच्या माध्यमातून स्वत:ला तंदुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. NCA मधील प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्या वयोगटातील पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या बॅचसह तो संवादात्मक सत्रांमध्येही वेळ घालवत आहे. एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी युवा क्रिकेटपटूंचे मनोबल वाढवण्यासाठी या सत्रांचे आयोजन केले आहे.

हेही वाचा: Nitin Menon: “भारतीय खेळाडू दबाव टाकतात पण…”, अंपायर नितीन मेनन यांचा टीम इंडियावर खळबळजनक आरोप, पाहा Video

डिसेंबर २०२२ मध्ये भारताच्या बांगलादेश दौऱ्यात पंत शेवटचा खेळला होता. मैदानापासून दूर राहणे ही पंतसाठी मोठी निराशा होती, असे समजले जाते की तो स्वतःला व्यस्त आणि सकारात्मक ठेवत आहे आणि बुमराह, श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णा एनसीए सारख्या इतर काही भारतीय खेळाडूंसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल पाहिली. मी पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करत आहे.