Morne Morkel Team India Bowling Coach Favourite Indian Food : भारत आणि बांगलादेश संघांत १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी भारतीय पदार्थांबद्दल आपली पसंती व्यक्त केली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या या माजी क्रिकेटपटूचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्याची जोरदार शिफारस केली होती. बीसीसीआयने अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये मॉर्केलने भारतीय आवडते पदार्थ कोणते आहेत? याबद्दल सांगितले.

मॉर्ने मॉर्केलचे आवडते भारतीय पदार्थ –

व्हिडीओमध्ये मॉर्ने मॉर्केल म्हणाले, “मला थोडी पुरी आवडते. तसेच नाष्ट्यात डोसा खायला आवडतो. त्याचबरोबर मुर्ग मलई, चिकन आणि नान ब्रेड आवडतात. पण मला वाटते की प्रशिक्षक म्हणून हेल्दी खाणे देखील महत्त्वाचे आहे. बाकीचे खेळाडू पण त्याचे अनुकरण करतील.” बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपासून ते भारतीय संघाच्या कोचिंग कार्यकाळाला सुरुवात करतील.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Indian communities Unity in Diversity
भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?

खेळाडूंसोबत चांगले संबंध निर्माण करणे महत्त्वाचे –

शनिवारी बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल म्हणाले, “मी आता सेटअपसोबत आहे. मी टीम इंडियासोबत एका चांगल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. तसेच त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी उत्सुक आहे, ज्यामध्ये खेळाडूंसोबत चांगले संबंध निर्माण करणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी अनेक खेळाडूंसोबत खेळलो आहे आणि आयपीएलमुळे माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत.”

हेही वाचा – Piyush Chawla : ‘तुझ्या मुलाबरोबरही खेळेन…’, पीयुष चावलाने आपल्या निवृत्तीबद्दल सांगताना पृथ्वी शॉची दिलं प्रत्युत्तर

प्रशिक्षण सत्रादरम्यान कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह संपूर्ण संघ एमए चिदंबरम स्टेडियमवर जमला होता. स्टार फलंदाज कोहलीने नेटवर सुमारे ४५ मिनिटे घालवली तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही सराव केला. कोहली लंडनहून थेट येथे पोहोचला आहे. जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंत गुरुवारीच येथे पोहोचले होते. जसप्रीत बुमराह टी-२० विश्वचषक २०२४ नंतर पहिली मालिका खेळणार आहे.

Story img Loader