IND vs WI ODI Series: सध्या भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत भारताकडे २-० अशी विजयी आघाडी आली आहे. रविवारी (२४ जुलै) झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा दोन गडी राखून पराभव करून पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला आहे. भारतीय संघाने एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सलग द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे.

हेही वाचा – ‘बापू बढू सारू छे! रोहित शर्माने गुजरातीमध्ये केली ‘या’ खेळाडूची स्तुती

वेस्ट इंडीजविरुद्धची सलग १२वी द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकून भारताने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. २००७ ते २०२२ या काळात भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध खेळली गेलेली प्रत्येक एकदिवसीय मालिका जिंकली आहे. अशी कामगिरी करून भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. यापूर्वी पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध सलग ११ एकदिवसीय मालिका जिंकून विश्वविक्रम केला होता. आता भारताने पाकिस्तानचा हा विश्वविक्रम भारताने मोडला आहे.

रविवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा दोन गडी राखून पराभव केला. वेस्ट इंडीजने निर्धारित ५० षटकांमध्ये सहा गडी गमावून ३११ धावा केल्या होत्या. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शेवटच्या षटकामध्ये विजय मिळवला. भारताकडून अक्षल पटेलने ३५ चेंडूत ६४ धावांची निर्णाय खेळी केली. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी (२७ जुलै) पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहे.

Story img Loader