Hardik Pandya Statement on rishabh pant : सरत वर्षाला निरोप दिल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षात नवा संकप्ल घेऊन क्रिकेटचा मैदानात उतरणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेचा थरार आजपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, भारताचा हुकमी यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज ऋषभ पंतला कार अपघातात दुखापत झाली. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात पंतसारखा दिग्गज खेळाडू सध्यातरी खेळणार नाही. याचा धक्का संपूर्ण भारतीय संघाला बसला असून कर्णधार हार्दिक पंड्याने पंतविषयी बोलताना मोठं विधान केलं आहे. ऋष पंतचा संघात समावेश असता तर, पंतने क्रिकेट खेळाचं रुपडं पालटलं असतं….पण आता सर्वांना परिस्थिती माहित आहे, असं पंड्या माध्यमांशी बोलताना म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हार्दिक पंड्या ऋषभ पंतविषयी बोलताना म्हणाला….

दिल्लीवरून घरी जाताना रुर्कीजवळ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर पंतला शुक्रवारी डेहराडून मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कार अपघातात गंभीर जखमी झालेला भारताचा यष्टिरक्षक- फलंदाज ऋषभ पंतच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा होत असून, सोमवारी त्याला अतिदक्षता विभागाबाहेर हलवण्यात आले. रस्त्यावरील खड्डा चुकवताना पंतचा कारवरील ताबा सुटला आणि अपघात घडला, अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना दिलीय.

हेही वाचा – India vs Sri Lanka : भारत विरुद्ध श्रीलंका पहिला ट्वेन्टी-२० सामना कधी? कुठं मोफत पाहता येणार

टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्या पंतविषयी माध्यमांशी बोलताना म्हणाला, “आगामी होणाऱ्या विश्वचषकासाठी ऋषभ पंत खूप महत्वाचा भाग होता. भारतीय संघाच्या प्लॅनमध्ये त्याचा सहभाग होता. पण सर्वांना आताची परिस्थिती माहित आहे. खूप खेळाडू आहेत, ज्यांना संधी मिळू शकते. पण ऋषभ पंतचा सहभाग असता, तर त्याने क्रिकेटच्या मैदानात चमकदार कामगिरी केली असती. पण आता प्रतीक्षा करूया आणि भविष्यात काय घडतंय,ते पाहुया.”

नक्की वाचा – विश्लेषण : टीम इंडियाचा ‘खेळ’ पाहून BCCI नं आणली Dexa Test; जाणून घ्या या टेस्टविषयी

भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक डावखुरा फलंदाज इशान किशन ऋषभ पंतच्या जागी खेळण्याची शक्यता आहे. बांगलादेश विरुद्ध छट्टोग्राममध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात किशनने वादळी खेळी करून द्विशतक झळकावले होते. एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान द्विशतक ठोकून किशनने ख्रिस गेलचा विक्रम मोडला. भारतीय संघाकडे पंतच्या जागेवर संजू सॅमसन आणि के एल राहुल दोघेही यष्टीरक्षक म्हणून पर्याय आहेत. दरम्यान,‘‘पंतची प्रकृती एकदम चांगली आहे. पंतच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा दिसल्यामुळे रविवारी रात्रीच त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर हलविण्यात आले. मात्र पंतच्या पायाला होणाऱ्या वेदना कायम आहेत. पंतची ‘एमआरआय’ चाचणी करण्याचा सध्या विचार नाही,’’अशी प्रतिक्रिया पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नुकतीच दिली होती.