KL Rahul said Sanju Samson will get a chance to bat at number five or six : टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन ज्याकडे अनेकवेळा दुर्लक्ष झाले आहे. संजू सॅमसनचे एकदिवसीय आकडे उत्कृष्ट आहेत, परंतु २०२३ च्या विश्वचषकात सूर्यकुमार यादवचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर आता संजू सॅमसनची दक्षिण आफ्रिका दौऱ्याची प्रतीक्षा संपणार आहे. १७ सेंबर रोजी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी केएल राहुलने संकेत दिले आहेत की, सॅमसनला या मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते.

संजू सॅमसनबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आत्तापर्यंत या संपूर्ण वर्षात फक्त दोन वनडे सामने खेळले आहेत. सॅमसन शेवटचा वेस्ट इंडिज दौऱ्यावर दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात खेळला होता. त्यादरम्यान त्याने मालिकेतील शेवटच्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले होते. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी कर्णधार केएल राहुलने पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘संजू सॅमसन मधल्या फळीत पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल.’

Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे

संजू सॅमसन यष्टिरक्षक करताना दिसणार नाही –

संजू सॅमसन मधल्या फळीत फलंदाजीसाठी येईल. मात्र यष्टिरक्षण तो स्वत: करणार असल्याचे राहुलने स्पष्ट केले. तो म्हणाला, ‘या वनडे मालिकेत मी यष्टिरक्षण आणि मधल्या फळीत फलंदाजी करेन. तसेच कसोटी मालिकेत कर्णधार आणि व्यवस्थापनाला हवी असलेली कोणतीही भूमिका साकारण्यास आनंद होईल. त्याचबरोबर मला टी-२० मध्येही देशासाठी खेळायचे आहे.’

हेही वाचा – IND vs SA : एबी डिव्हिलियर्सचा मोठा खुलासा! ‘या’ भारतीय खेळाडूमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

रिंकू सिंगला वनडे पदार्पणाची संधी मिळणार –

केएल राहुल म्हणाला, ‘आम्ही रिंकू सिंगला आयपीएलमध्ये खेळताना पाहिले, त्यानंतर तो टी-२० क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्यामुळे आता त्याला एकदिवसीय मालिकेदरम्यान संधी दिली जाऊ शकते.’ रिंकू सिंगने लिस्ट ए क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने ५५ सामन्यांच्या ५० डावांमध्ये ४९.८३ च्या सरासरीने १८४४ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारे त्याची वनडे संघात निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा – IPL 2024 : कर्णधार करत असाल तर येतो, हार्दिकच्या या अटीने गेलं रोहितचं कर्णधारपद

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षण), रिंकू सिंग, अक्षर पटेल, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार, युजवेंद्र चहल, तिलक वर्मा, रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, आकाश दीप