Team India Applauds For Successful Chandrayaan 3 Moon Landing Video Viral : गेल्या काही दिवसांपासून भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेवर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. परंतु, आज सायंकाळी भारताचं चांद्रयान ३ चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचलं आणि सर्वच स्तरातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव झाला. हा ऐतिहासिक क्षण सर्वांनीच दृश्यप्रणालीच्या माध्यमातून अनुभवला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा क्षण अविस्मरणीय असल्याचं म्हटलं आहे. अशातच आता भारतीय क्रिकेट संघानेही चांद्रयान मोहिम यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. टाळ्यांचा गजर करून टीम इंडियाच्या खेळाडूंनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. बीसीसीआयने खेळाडूंचा डब्लिनमधील हा सुंदर व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा – ICC ODI Rankings : गिलसाठी शुभसंकेत! वनडे रँकिंगमध्ये घेतली उत्तुंग भरारी! कोहलीला पछाडत शुबमनने पटकावलं ‘हे’ स्थान

इथे पाहा टीम इंडियाच्या खेळाडूंचा व्हिडीओ

बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर खेळाडूंचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, “चंद्रावर भारताचं विक्रम लॅंडर यशस्वीपणे पोहोचल्याचं आनंद साजरा करताना टीम इंडियाचे खेळाडू…” डबलिन येथून या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला असल्याचं ट्वीटर पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये भारताने इतिहास रचला, मिशन यशस्वी झाल्याने अभिनंदन, असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india celebrates chandrayaan 3 moon landing live bcci shared indian cricket team players beautiful video ind vs ire dublin update nss