Gautam Gambhir Coaching Staff four Possible Choices : भारतीय क्रिकेट संघ लवकरच श्रीलंकेला रवाना होणार आहे. टीम इंडिया रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सोमवारी पत्रकार परिषद घेऊ शकतात. गंभीरच्या कोचिंगमध्ये कोणाचा सहभाग असेल याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण एका रिपोर्टनुसार, गंभीरच्या कोचिंग टीममध्ये चार दिग्गज असतील. ज्यामध्ये अभिषेक नायरला सहाय्यक प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. तसेच दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू मॉर्ने मॉर्केलचाही समावेश असू शकतो. मात्र, यासंदर्भात बीसीसीआयने कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकेटबझच्या एका बातमीनुसार, गौतम गंभीरच्या स्टाफमध्ये दोन सहाय्यक प्रशिक्षक असू शकतात. अभिषेक नायरसह नेदरलँडचा माजी खेळाडू रायन टेन डोशेटलाही ही जबाबदारी दिली जाऊ शकते. डोशेट आणि नायर यांनी याआधी गंभीरबरोबर काम केले आहे. या तिघांनी आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्ससाठी काम केले आहे. आता ते टीम इंडियासाठी काम करू शकतात.

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू मॉर्ने मॉर्केल भारताचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक होऊ शकतो. मॉर्केलकडे कोचिंगचा चांगला अनुभव आहे. त्याची कारकीर्दही उत्तम राहिली आहे. मॉर्केलने दक्षिण आफ्रिकेसाठी ११७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत १८८ विकेट्स घेतल्या आहेत. यासह त्याने ४४ टी-२० सामन्यात ४७ विकेट्स घेतल्या आहेत. मॉर्ने मॉर्केलने ८६ कसोटी सामनेही खेळले आहेत. यामध्ये ३०९ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – Smriti Mandhana : नॅशनल क्रशने जिंकली चाहत्यांची मनं, आपल्या स्पेशल फॅनला गिफ्ट केली खास गोष्ट, पाहा VIDEO

त्याचबरोबर टीम इंडियाचे फिल्डिंग कोच टी दिलीप यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकते. त्यांना पुन्हा संधी मिळू शकते. दिलीप यांच्या कार्यकाळात भारतीय युवा खेळाडूंना खूप फायदा झाला आहे. त्यामुळे बहुधा त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – T20 Blast 2024 : लाइव्ह मॅचमध्ये कोल्हा मैदानात घुसल्याने खेळाडूंची उडाली तारांबळ, VIDEO व्हायरल

टीम इंडियाचा संभाव्य कोचिंग स्टाफ : गौतम गंभीर (मुख्य प्रशिक्षक), मॉर्ने मॉर्केल (गोलंदाजी प्रशिक्षक), अभिषेक नायर (सहाय्यक प्रशिक्षक), रायन टेन डोशेट (सहाय्यक प्रशिक्षक) आणि टी दिलीप (क्षेत्ररक्षक प्रशिक्षक)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india coach gautam gambhirs support staff may include morne morkel abhishek nair ryan ten doeschate t dilip vbm