Ravi Shastri On Rahul Dravid Coaching: गेल्या १६ महिन्यांपासून राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. द्रविडचे कोचिंग टीम इंडियासाठी आतापर्यंत काही खास राहिलेले नाही. त्यांच्या कार्यकाळात संघाने आशिया कप आणि टी२० विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा गमावल्या आहेत. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातही संघाचा पराभव झाला होता. आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी राहुल द्रविडच्या कोचिंगवर भाष्य केले. गप्पा मारताना ते म्हणाले की, माझ्या कार्यकाळात आम्ही दोन आशिया चषक जिंकले, कोणालाच आठवत नाही. भारतीयांची स्मरणशक्ती फार कमकुवत आहे.”
भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी चाहत्यांना सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबत अधिक संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. द्रविडला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आणि भारत अ यांच्यासोबत काम करण्याचा फायदा झाल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र, द्रविड आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ आणि आशिया चषक जिंकण्यातही अपयशी ठरला आहे. यावर्षी अजून तीन मोठ्या स्पर्धा होणार आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक आणि आशिया कप. यानंतर पुढील वर्षी आयसीसी टी२० विश्वचषकही होणार आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांनी प्रशिक्षकावर विश्वास ठेवावा असे शास्त्री यांना वाटते आणि प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो असे वाटते.
स्पोर्ट्स तकवर रवी शास्त्री म्हणाले, “संघाशी जुळवून घ्यायला द्रविडला वेळ लागतो आहे. मलाही वेळ लागला होता आणि त्यांच्यासाठीही तेवढा वेळ लागणार आहे. पण राहुलचा एक फायदा आहे की तो एनसीएमध्ये होता, तो ‘अ’ संघाशी देखील जोडला गेला होता आणि आता तो इथेही आहे. त्याला समकालीन क्रिकेटपटू आणि यंत्रणांचा अनुभव आहे, आपण त्यांना वेळ द्यायला हवा.”
भारताने २०१३ मध्ये शेवटची आयसीसी स्पर्धा जिंकली होती. माजी प्रशिक्षकाने निदर्शनास आणून दिले की भारताने २०१६ आणि २०१८ मध्ये त्यांच्या कार्यकाळात दोन वेळा आशिया चषक जिंकले, परंतु कोणालाही आठवत नाही. शास्त्री पुढे म्हणाले की, “मोठ्या स्पर्धा जिंकण्यात नशिबाची मोठी भूमिका असते आणि तुम्ही तुमचे सर्वोत्तम देत आहात.”
हेही वाचा: Shoaib Akhtar: “तीनपैकी ‘हा’ फॉरमॅट सोडून दे!” विराट कोहलीला शोएब अख्तरचा अजब सल्ला
भारतीयांची स्मरणशक्ती कमकुवत-शास्त्री
रवी शास्त्री म्हणाले, “आपल्या देशातील लोकांची स्मरणशक्ती खूपच कमी आहे. जिंकायचे असेल तर जिंकावेच लागेल. माझ्या कार्यकाळात आम्ही यश मिळवले होते पण कोणालाच आठवत नाही. कोणीतरी आशिया चषकाचा उल्लेख केला आहे का? आम्ही दोनदा जिंकलो आहोत. आणि कोणीही याबद्दल बोलत नाही. मात्र आशिया चषक स्पर्धेत हरलो की स्पर्धेचे चित्र समोर येते. का? म्हणूनच मी म्हणतोय, प्रयत्न नेहमीच असायला हवेत.”