भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार चुनी गोस्वामी यांचं गुरुवारी कोलकात्यात निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते, १९६२ साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना चुनी गोस्वामी यांनी संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. फुटबॉल व्यतिरीक्त गोस्वामी बंगालकडून स्थानिक क्रिकेटही खेळले आहेत. भारतीय फुटबॉल संघाचे सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्यांची ओळख होती. १९६२ च्या यशानंतर १९६४ सालीही गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला रौप्यपदक मिळालं होतं.
भारतीय क्रीडाक्षेत्राला धक्का! यजमानपदाचे हक्क गमावण्याची नामुष्की
गोस्वामी यांना माजी क्रिकेटपटू आणि भारताच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. चुनी गोस्वामी- भारताचे एक अत्यंत प्रतिभावान अष्टपैलू व्यक्तिमत्व… सहज सोप्या पद्धतीने क्रीडाप्रकार कसे खेळावे हे त्यांच्याकडून समजते. फुटबॉल खेळण्याची त्यांना खूप चांगली समज होती. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे ट्विट शास्त्री यांनी केले.
अल्लू अर्जुनच्या गाण्यावर वॉर्नर दांपत्याचा डान्स सुरु असतानाच लेक मध्ये आली अन्…
#ChuniGoswami – Easily one of India’s best all-round sportsman with ball sense in his blood. May his soul rest in peace pic.twitter.com/4bCTXmE22x
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) May 1, 2020
“काल इरफान खान, आज ऋषी कपूर.. सत्य पचवणं खूप अवघड जातंय”
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्यामुळे गोस्वामी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मधुमेह, ब्लड प्रेशर यासारख्या अनेक आजारांनी गोस्वामी त्रस्त होते. कार्डिएक अरेस्टमुळे गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोस्वामी यांनी ५० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. याव्यतिरीक्त कोलकात्यातील मोहन बागान फुटबॉल क्लबकडूनही ते सुरुवातीच्या दिवसांमध्ये खेळत होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय फुटबॉल क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.