भारताचा जसप्रीत बुमराहा हा अल्पावधीतच जागतिक क्रिकेटमधील एक आघाडीचा वेगवान गोलंदाज म्हणून उदयास आला. भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या ताफ्याचं नेतृत्व करण्याचा बहुमान त्याला फारच लवकर मिळाला. बुमराहने गेल्या काही वर्षांत विदेशात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पण बुमराहच्या बाबतीत एक विचित्र गोष्ट घडली होती. जागतिक दर्जाचा गोलंदाज असूनही बुमराहला घरच्या मैदानावर कसोटी पदार्पण करण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागली. इंग्लंडविरुद्ध आज सुरू झालेल्या सामन्यात बुमराहने एक आगळावेगळा पराक्रम करत विश्वविक्रमाची बरोबरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video: बाबोsssss गेलने कुटल्या २२ चेंडूत ८४ धावा

दक्षिण आफ्रिकेच २०१८ मध्ये जसप्रीत बुमराहने कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर प्रत्येक दौऱ्यावर बुमराहने स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली. पण घरच्या मैदानावर पहिली कसोटी खेळण्याआधी विदेशात सर्वाधिक कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने थेट विश्वविक्रमाची बरोबरी केली. बुमराहने इंग्लंडविरूद्ध आज भारतात आपली पहिली कसोटी खेळली. याआधी त्याने विदेशात तब्बल १७ कसोटी सामने खेळले. घरच्या मैदानाआधी विदेशात सर्वाधिक कसोटी खेळणाऱ्या खेळाडूचा विक्रम वेस्ट इंडिजच्या डॅरेन गंगाच्या (१७) नावावर होता. त्या विक्रमाशी आज बुमराहने बरोबरी केली. भारतीय खेळाडूंचा विचार केल्यास वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने विदेशात १२ कसोटी खेळल्यावर भारतात कसोटी पदार्पण केले होते.

दरम्यान, जसप्रीत बुमराहने आणखी एक विक्रम केला. घरच्या मैदानावर पहिली कसोटी खेळण्याआधी सर्वाधिक गडी मिळवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सामना सुरू होण्याआधी बुमराहच्या नावावर ७९ कसोटी बळी होते. हा विश्वविक्रम आधी वेस्ट इंडिजच्या अल्फ व्हॅलेंटाइन यांच्या नावावर होता. त्यांनी मायदेशात पहिली कसोटी खेळण्याआधी विदेशात ६५ कसोटी बळी टिपले होते.